---Advertisement---

एकच मारला कच्चून मारला! बटलरने भिरकावला हंगामातील दुसरा सर्वात लांब षटकार, गंभीरची रिऍक्शन पाहाच

On: गुरूवार, एप्रिल 20, 2023 11:32 AM
Jos-Buttler
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. विशेष म्हणजे, राजस्थानसोबतच त्यांचे खेळाडूही शानदार कामगिरी करत आहेत. त्यात जोस बटलर या विस्फोटक फलंदाजाचाही समावेश आहे. बटलरसाठी हा हंगामही शानदार ठरत आहे. जयपूर येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात हंगामातील 26वा सामना  बुधवारी (दि. 19 एप्रिल) पार पडला. या सामन्यात राजस्थानला 10 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. असे असले, तरीही राजस्थानचा फलंदाज बटलर मात्र चांगलाच चमकला. बटलरने यशस्वी जयसवाल याच्यासोबत मिळून संघासाठी पुन्हा एकदा चांगली सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 47 धावा चोपल्या. यादरम्यान बटलरने खणखणीत षटकार मारला, जो हंगामातील सर्वात लांब षटकार ठरला.

बटलरचा सर्वात लांब षटकार
या सामन्यात लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 154 धावा केल्या होत्या. लखनऊच्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलर (Jos Buttler) याने युद्धवीर सिंग टाकत असलेल्या त्याच्या दुसऱ्या आणि डावाच्या पाचव्या षटकात शानदार गगनचुंबी षटकार खेचला. या षटकातील ताशी 137.4 किमी गतीच्या चौथ्या चेंडूवर बटलरने डीप मिडविकेटच्या दिशेने खणखणीत षटकार मारला. हा चेंडू थेट स्टँड्सवर पोहोचला. या षटकाराची लांबी तब्बल 112 मीटर इतकी होती. हा या हंगामातील दुसरा सर्वात लांब षटकार ठरला.

यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने तब्बल 115 मीटर लांबाची सर्वात लांब षटकार मारला होता. तसेच, सर्वात लांब षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्स संघाचा फलंदाज शिवम दुबे आहे. त्याने 111 मीटर लांब षटकार मारला होता.

आयपीएल 2023 स्पर्धेत सर्वात लांब षटकार मारणारे फलंदाज
फाफ डू प्लेसिस- 115 मीटर
जोस बटलर- 112 मीटर
शिवम दुबे- 111 मीटर

विशेष म्हणजे, बटलरचा 112 मीटर लांबीचा षटकार पाहून लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर हादेखील हैराण झाला. गंभीरची ही रिऍक्शन आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनली आहे.

https://twitter.com/iVikramRajput/status/1648724752507490305

बटलरने या सामन्यात 41 चेंडूंचा सामना करत 40 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 4 चौकारांचीही बरसात केली. बटलरने 40 धावा केल्यामुळे तो हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. त्याने 6 सामन्यात 40.67च्या सरासरीने तब्बल 244 धावा चोपल्या आहेत. (cricketer jos buttler hits 112 meter six 2nd longest six of ipl 2023 gautam gambhir reaction)

आयपीएल 2023मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
फाफ डू प्लेसिस- 259
जोस बटलर- 244*
वेंकटेश अय्यर- 234
शिखर धवन- 233
शुबमन गिल- 228

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सवर अतिक्रमणचा आरोप; क्रीडा मंत्र्यांच्या जिद्दीपुढे दंड भरण्यास तयार
पराभवाने पूर्ण खचला कर्णधार संजू सॅमसन; म्हणाला, ‘जास्त प्रयत्न केला अन् विकेट्स…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---