इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसन सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने याबद्दल इंस्टाग्राम आणि ट्विटरवरअधिकृत घोषणा केली आहे.
https://twitter.com/KP24/status/974917220206653440
पाकिस्तान सुपर लिग ही त्याची शेवटची व्यावसायिक स्पर्धा होती. त्यात त्याने तो क्वेट्टा ग्लॅडीएटर संघाकडून खेळत होता.
जर क्वेट्टा ग्लॅडीएटर संघ पुढच्या फेरीत गेला आणि तो सामना जर पाकिस्तानात असेल तर तो खेळणार नसल्याचे पिटरसनने आधीच स्पष्ट केले होते.
You will be missed @KP24
Great career!!
Thank you for everything. Wish you could stayed with us till PSL final but we respect your decision. pic.twitter.com/J84LYVNHgd— Quetta Gladiators (@TeamQuetta) March 17, 2018
क्वेट्टा ग्लॅडीएटर संघ ६ संघात चौथ्या स्थानी राहीला. Eliminator 1 चा त्यांचा सामना हा लाहोर शहरा त होणार असल्यामुळे पिटरसचा कालचा सामना शेवटचा ठरला.
https://twitter.com/KP24/status/974968105930772482
” माझा क्रिकेटचा आजपर्यंतचा प्रवास खूप चांगला राहीला. परंतु ह्या न संपणाऱ्या प्रवासाला कुठेतरी थांबवावं लागणार आहे. क्रिकेट हा कायमच जिवनाचा अविभाज्य आणि सर्वोत्तम भाग आहे.” असे त्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये पाकिस्तान सुपर लिग सुरू होण्यापुर्वी म्हटले होते.
केविन पिटरसन इंग्लंडकडून १०४ कसोटी, १३५ वनडे आणि ३७ टी२० सामने खेळला आहे.
त्याने त्याच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यात मिळून ३० हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.