भारतीय संघाचा यशस्वी माजी कर्णधार एमएस धोनी याने त्याच्या नेतृत्वाने सर्वांवर प्रभाव टाकला आहे. आजही त्याच्या नेतृत्वाची क्रिकेटविश्वात चर्चा होते. अनेक खेळाडू त्याला आदर्श मानतात. फक्त देशातीलच नाही, तर जगभरातील क्रिकेटपटू त्याची प्रशंसा करताना थकत नाहीत. अशात आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा आणि इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याने त्याच्या कारकीर्दीत धोनीच्या प्रभावाविषयी खुलासा केला आहे. चला तर जाणून घेऊयात काय म्हणालाय मोईन अली.
अनुभवी अष्टपैलू मोईन अली (Moeen Ali) याने खुलासा केला की, एमएस धोनी (MS Dhoni) हा नेतृत्वाविषयीच्या प्रत्येक प्रश्नासाठी तयार असतो. तसेच, तो सर्व प्रश्नांची उत्तरेही देतो. मोईन सध्या दुबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लीग टी20 (ILT20) स्पर्धेत शाहजाह वॉरिअर्स (Sharjah Warriors) संघाचे नेतृत्व करत आहे.
आयपीएल 2021मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने मोईन अली याला ताफ्यात सामील केले होते. तसेच, त्यानेही आपल्या अष्टपैलू कामगिरीने संघाला विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने 2021च्या आयपीएल हंगामात 15 सामन्यात 137.30च्या स्ट्राईक रेटने 357 धावा चोपल्या होत्या. तसेच, गोलंदाजी करताना 6 विकेट्सही घेतल्या होत्या.
माध्यमांशी बोलताना मोईन अली याने सांगितले की, कशाप्रकारे चेन्नई संघाकडून खेळताना तो खूप काही शिकला. तसेच, धोनीच्या मदतीचाही त्याने यावेळी उल्लेख केला. तो म्हणाला की, “मी एमएस धोनीसोबत काही वेळ घालवला आहे. तसेच, त्याच्यासोबत चर्चाही केली. मी नेतृत्वाबाबत प्रश्न विचारतो आणि तो उत्तर देतो. एक कर्णधाराच्या रुपात, मी त्याच्याकडून खूप काही शिकलो. मी त्याच्या फलंदाजीतूनही खूप काही शिकलो आहे. तुम्ही सीएसकेमध्ये खूप काही शिकता.”
चेपॉकमध्ये खेळण्यासाठी मोईन अली उत्साहित
मोईन अली याने आयपीएल 2023 (IPL 2023) चेपॉकमध्ये खेळण्याबाबत उत्सुकता जाहीर केली. तसेच, तो म्हणाला की, “मला इतर संंघांबद्दल माहिती नाही. मात्र, सीएसके एक कौटुंबिक फ्रँचायझी आहे. मी या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यांचा लिलाव चांगला राहिला. मी नवीन खेळाडूंसोबत खेळण्यासाठी खूपच उत्सुक आहे. तसेच, सर्वात मोठी बाब अशी की, मी चेपॉक आणि प्रेक्षकांची वाट पाहत आहे.”
मागील काही काळापासून आयपीएलचे आयोजन देशाबाहेर होत होते. तसेच, मध्यंंतरी ठरलेल्या ठिकाणी खेळले गेले. त्यामुळे अनेक संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, यावेळी हे स्पष्ट केले आहे की, स्पर्धा पूर्वीप्रमाणे घरच्या आणि इतर मैदानांवर खेळला जाईल. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघालाही त्यांच्या घरच्या चेपॉक मैदानात खेळण्याची संधी मिळेल. चाहते आणि जगभरातील क्रिकेटपटू या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. (cricketer moeen ali has opened up about how ms dhoni has positively impacted his career)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-श्रीलंका संघातील तिसरा वनडे सामना फ्रीमध्ये पाहायचाय? तर ही बातमी तुमच्यासाठी
रोहित शर्माला हवीये फक्त 1 धाव आणि भारताचा विजय, नावावर होईल धोनी अन् द्रविडलाही न जमलेला विक्रम