‘कॅप्टनकूल’ महेंद्रसिंग धोनी आपल्या निवृत्तीनंतरही कोणत्या ना कोणत्या कारणावरुन कायम चर्चेत आहे. धोनीने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर आपल्या शेतातील स्ट्रॉबेरी खाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. काही मिनिटातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर वायरल झाला होता. आता धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याचे इंस्टाग्रामवर 30 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत.
खरंतर धोनी सोशल मीडियात फारसा वेळ घालवत नाही. कधीकधी तो पाच ते सहा महिन्यानंतर एक पोस्ट करतो, असे असून देखील धोनीचा जलवा सोशल मीडियात कायम आहे. धोनी भारतीय खेळाडूंमध्ये इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला दुसरा क्रिकेटर आहे. पहिल्या क्रमांकावर भारतीय कर्णधार विराट कोहलीचा क्रमांक येतो. विराटचे इंस्टाग्रामवर 88 मिलियन फॉलोअर्स आहेत. धोनी व विराट मधील फरक तब्बल 58 मिलियन फॉलोअर्सचा आहे, हे विशेष.
धोनी सध्या क्रिकेट पासून दूर असून तो शेतीत रमला आहे. धोनी आता मैदानावर थेट आयपीएल 2021 मध्येच दिसणार आहे. आयपीएल 2020 मधील निराशाजनक कामगिरी मागे टाकून धोनी आयपीएल 2021 मध्ये उत्तम कामगिरी करेल अशी सर्व क्रिकेटप्रेमींना आशा असणार आहे.
धोनीने मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“सेंचूरी नंतरची परंपरा…”, सिडनी कसोटीतील धडाकेबाज शतकानंतर स्मिथचं पत्नीसोबत हटके सेलिब्रेशन
कमिन्सच्या सुरेख चेंडूवर कर्णधार अजिंक्य रहाणे बोल्ड, पाहा व्हिडिओ
पाकिस्तान दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकन संघाची घोषणा; ‘या’ घातक वेगवान गोलंदाजाचे पुनरागमन