---Advertisement---

W,W,W,W,W,W : ‘या’ गोलंदाजाने 6 चेंडूत घेतल्या सलग 6 विकेट्स, एकाच षटकात डबल हॅट्रिक घेऊन रचला इतिहास

On: शनिवार, जून 17, 2023 7:20 AM
Stumps
---Advertisement---

क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथे दिवसा-दिवसाला अनेक विक्रम रचले जातात आणि मोडलेही जातात. कधी फलंदाज, कधी गोलंदाज, तर कधी चक्क क्षेत्ररक्षकही विक्रमांचे मनोरे रचतात. अशात नुकतेच इंग्लंडमधील एका युवा गोलंदाजाने असा विक्रम रचला आहे, ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. आपण क्रिकेटमध्ये एका षटकात सलग 6 षटकार मारताना फलंदाजांना पाहिलं आहे, पण या युवा पठ्ठ्याने आपल्या षटकातील सलग सहा चेंडूवर 6 विकेट्स चटकावल्या आहेत. तसेच, एका षटकात दोन हॅट्रिक घेण्याची कामगिरीही केली आहे. या गोलंदाजाने ही कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, हा गोलंदाज अवघ्या 12 वर्षांचा आहे.

ब्रूम्सग्रोव्ह क्रिकेट क्लब (Bromsgrove Cricket Club) यांच्या ट्विटर हँडलवर या 12 वर्षीय गोलंदाजाच्या कामगिरीसह त्याचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये ब्रूम्सग्रोव्ह क्रिकेट क्लबने लिहिले की, “शुक्रवारी 12 वर्षांखालील सामन्यात ओली व्हाईटहाऊस एका षटकात सहा विकेट्स घेतल्या. सर्व विकेट्स हा त्रिफळाचीत पद्धतीने घेतल्या.”

ब्रूम्सग्रोव्ह क्रिकेट क्लबच्या या गोलंदाजाचे प्रत्येकजण कौतुक करत आहेत. यामध्ये क्लब क्रिकेटचे पहिले कर्णधार जेडन लेव्हिट यांचाही समावेश आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “ओलीने जी कमाल केली आहे, त्यावर विश्वास करणेही कठीण आहे. हा किती मोठा कारनामा आहे, याचा अंदाज ओलीला नसावा. मात्र, नंतर कदाचित त्याला याचे महत्त्व समजेल.”

एकाच षटकात 6 विकेट्स
ओली व्हाईटहाऊस (Ollie Whitehouse) हा डावखुरा फिरकीपटू आहे. त्याने एकाच षटकात 6 विकेट्स घेण्याचा मोठा कारनामा केला आहे. तसेच, त्याने त्याच्या पुढच्या षटकात आणखी 2 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे त्याने 2 षटके गोलंदाजी करताना 8 विकेट्स आपल्या खात्यात टाकले. रंजक बाब अशी की, या 2 षटकात गोलंदाजाने एकही धाव खर्च केली नाही. इतकेच नाही, तर गोलंदाजाने 8 फलंदाजांना त्रिफळाचीत बाद करून तंबूचा रस्ता दाखवला. (cricketer ollie whitehouse took double hat trick in club cricket bromsgrove cricket club in england)

महत्वाच्या बातम्या-
रत्नागिरी जेट्सचा सोलापूर रॉयल्सला धोबीपछाड! सांघिक कामगिरीच्या जोरावर मिळवला शानदार विजय
ऍशेस 2023: पहिला दिवस ‘बॅझबॉल’चा! रुटच्या शतकासह डाव घोषित करून ऑस्ट्रेलियाला ढकलले बॅकफूटवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---