---Advertisement---

‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून आला अन् साहाला थेट तंबूतच पाठवलं; धुरंधराच्या कॅचचा ‘हा’ व्हिडिओ लगेच पाहा

On: रविवार, मे 7, 2023 9:14 PM
Wriddhiman-Saha-And-Prerak-Mankad
---Advertisement---

रविवारचा (दि. 7 मे) दिवस गुजरात टायटन्स संघासाठी खास ठरला. आयपीएल 2023चा 51वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स वि. लखनऊ सुपर जायंट्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात गुजरातने लखनऊविरुद्ध 56 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयात फलंदाजांसोबतच गोलंदाजाचेही मोलाचे योगदान होते. गुजरातने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली होती. यावेळी सलामीवीर वृद्धिमान साहा याने केलेल्या फटकेबाजीमुळे गुजरातला 200 धावांचा टप्पा पार करण्यात मोलाचा हातभार लागला. मात्र, वादळी फटकेबाजी करणाऱ्या साहाला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून आलेल्या खेळाडूने झेलबाद करत तंबूत धाडले. यादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 227 धावा केल्या होत्या. गुजरातसाठी यावेळी वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 12.1 षटकात 142 धावांची वादळी भागीदारी रचली होती. यामध्ये साहाच्या 81 आणि गिलच्या 57 धावांचा समावेश होता.

प्रेरक मंकडचा झेल
गुजरातच्या डावातील 13वे षटक लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खान टाकत होता. आवेशच्या चेंडूवर साहाने डीप स्क्वेअरच्या दिशेने फटका मारला. हा शॉट व्यवस्थित बॅटवर आला नव्हता. त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाण्यापूर्वीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या ‘इम्पॅक्ट प्लेअर’ प्रेरक मंकड (Prerak Mankad) याने धावत जाऊन अफलातून झेल पकडला. मात्र, झेल घेतल्यानंतर मंकड जमिनीवर पडला, पण त्याने संतुलन बनवत आपल्या शरीराचा कोणताही भाग सीमारेषेला लागणार नाही याची काळजी घेतली. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सामन्याचा आढावा
साहाने 43 चेंडूंच्या मदतीने 81 धावा केल्या. यामध्ये 4 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. साहा बाद झाल्यानंतर पुढे गिलने 51 चेंडूत नाबाद 94 धावा चोपल्या. या दोघांच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातने 20 षटकात 2 विकेट्स गमावत 227 धावा चोपल्या. तसेच, विजयासाठी लखनऊपुढे 228 धावांचे आव्हान ठेवले. मात्र, लखनऊला 20 षटकात 7 विकेट्स गमावत 171 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना 56 धावांनी जिंकण्यात गुजरातला यश आले. (cricketer prerak mankad outstanding catch of wriddhiman saha on deep square leg see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उलटी पॅन्ट घालून रिद्धिमान साहा मैदानात, जाणून घ्या का घडला हास्यास्पद प्रकार
अहमबादेत लखनऊची धूळधाण, गुजरातच्या 228 धावांचा पाठलाग करताना टाकल्या नांग्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---