---Advertisement---

पृथ्वी शॉने द्विशतक ठोकताच ट्विटरवर प्रतिक्रियांचा महापूर; नेटकरी म्हणाले, ‘भविष्यातील सेहवाग, आता गिलला…’

Prithvi-Shaw
---Advertisement---

मागील काही काळापासून युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला आयपीएल 2023 स्पर्धेतही खास कामगिरी करता आली नव्हती. मात्र, भारतीय युवा सलामीवीराने इंग्लंडच्या रॉयल लंडन वनडे कपमध्ये द्विशतक ठोकून जबरदस्त पुनरागमन केले आहे. पृथ्वीने द्विशतक ठोकत निवडकर्त्यांना एकप्रकारे संकेतच दिले आहे की, तो अजूनही खतरनाक फलंदाजी करू शकतो.

रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेत पृथ्वी शॉ नॉर्थम्प्टनशायर (Prithvi Shaw Northampton) संघाकडून खेळताना चमकला. त्याने समरसेट संघाविरुद्ध अवघ्या 153 चेंडूत 244 धावांचा पाऊस पाडला. या धावा करताना त्याने 11 षटकार आणि 28 चौकारांचीही बरसात केली. त्याने यावेळी समरसेट संघाच्या जवळपास सर्वच गोलंदाजांची धुलाई केली. विशेष म्हणजे, पृथ्वीने पहिल्या 81 चेंडूत आपले शतक झळकावले. त्यानंतर त्याने झंझावाती फलंदाजी करत 129 चेंडूत द्विशतकही साजरे केले.

अशात मागील काही काळापासून खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या पृथ्वी शॉच्या द्विशतकानंतर ट्विटरवर प्रतिक्रिया उमटल्या नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा पाऊस पाडला. चला तर नेटकरी नेमकं काय म्हणालेत, हे जाणून घेऊयात…

एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “भविष्यातील सचिन, लारा, सेहवाग फॉर्ममध्ये आला आहे. शुबमन गिलला लवकरच रिप्लेस केले पाहिजे.”

https://twitter.com/140off113/status/1689261165078294528

दुसऱ्या एकाने लिहिले की, “129 चेंडूत 200 धावा दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगल्या आहेत, पण भारतीय संघात जागा मिळणे कठीण आहे.”

https://twitter.com/ProteinEnforcer/status/1689262263998562304

आणखी एकाने लिहिले की, “पृथ्वी शॉ आपला हा फॉर्म कायम ठेव आणि लक्ष केंद्रित कर. तू लवकरच भारतीय संघात पुनरागमन करशील.”

https://twitter.com/tmnarayan/status/1689263788653248512

एकाने निवडकर्त्यांवर निशाणा साधत म्हटले की, “पृथ्वी शॉने भारतीय निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाच्या तोंडावर हा रेकॉर्ड मारला आहे.”

https://twitter.com/itzakvidhu/status/1689261538388140034

दुसऱ्याने चक्क रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे नाव घेत ट्वीट केले की, “पृथ्वी शॉ पुढील रोहित शर्मा बनण्याची तयारी करत आहे. स्कोरवरूनही आणि फिटनेसच्या हिशोबानेही.”

https://twitter.com/CricManjit/status/1689261390807367681

एक जण असे म्हणाला की, “पृथ्वी शॉ या पिढीतल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी आहे, पण बोर्डाच्या कारणामुळे त्याची कारकीर्द खराब होतेय.”

https://twitter.com/NeelJos57632860/status/1689266573062889473

फिटनेसविषयी बोलताना एकाने ट्वीट केले की, “पृथ्वी शॉने जर त्याच्या प्रशिक्षकाचे ऐकले आणि फिट राहिला, तर तो भारताचा पुढील सुपरस्टार बनेल.”

https://twitter.com/KP07_/status/1689262172226957312

एकाने तर मागील विकेटचा उल्लेख करत लिहिले की, “असे वाटत होते, जसे पृथ्वी शॉ मागील सामन्यात आपल्या लाजीरवाण्या पद्धतीने बाद होण्याचा बदला घेत होता.”

https://twitter.com/dashman207/status/1689276205340508161

पृथ्वी शॉच्या खेळीमुळे नॉर्थम्प्टनशायर संघाने 50 षटकात 8 विकेट्स गमावत 415 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना समरसेट संघाचा डाव 45.1 षटकात 328 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे हा सामना नॉर्थम्प्टनशायर संघाने 87 धावांनी आपल्या नावावर केला. (cricketer prithvi shaw hits double century in one day cup twitter reaction)

महत्त्वाच्या बातम्या-
“आमच्या वेळी म्हणायचे…” भारत-पाकिस्तान सामन्याबाबत दिग्गजाचे मोठे विधान
इंग्लंडच्या ऍशेस हिरोला खेळायचीय आयपीएल, लिलावाबाबत म्हणाला, “मला कोणीतरी…”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---