भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याचे नशीब फळफळले आहे. दीर्घ काळ संघात जागा मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शॉला अखेर भारतीय संघात जागा मिळाली आहे. खरं तर, देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे पृथ्वी शॉ याला भेट मिळाली आणि त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. मात्र, भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिल्या टी20 सामन्यापूर्वी भावूक वक्तव्य केले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) रांची येथे पहिला टी20 सामना खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने बीसीसीआयला मुलाखत दिली. बीसीसीआयला मुलाखत देताना त्याने त्याच्या पुनरागमनाचा रंजक किस्सा सांगितला, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने स्वत: शेअर केला आहे.
भारतीय संघातील पुनरागमनावर का घाबरला पृथ्वी शॉ?
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी पृथ्वी शॉ याला भारतीय संघात सामील करण्यात आले आहे. मात्र, दीर्घ काळानंतर जेव्हा त्याला संघात निवडले, तेव्हा तो चांगलाच घाबरला होता. अशात कोणत्या गोष्टीची भीती वाटली, हे त्याने सांगितले आहे.
From emotions on #TeamIndia comeback & the support system to reuniting with former U-19 teammates and Head Coach Rahul Dravid 👍 👍
𝗗𝗢 𝗡𝗢𝗧 𝗠𝗜𝗦𝗦 as @PrithviShaw discusses all this & more 👌 👌 – By @ameyatilak
Full interview 🎥 🔽 #INDvNZhttps://t.co/ZPZWMbxlAC pic.twitter.com/IzVUd9tT6X
— BCCI (@BCCI) January 27, 2023
बीसीसीआयशी बोलताना पृथ्वी शॉ म्हणाला की, “भारतीय संघाची निवड रात्री उशिरा झाली होती. जवळपास 10.30 वाजता संघाची निवड झाली असेल. मी पाहिले की, मोबाईलवर अनेक मेसेज आणि मिस कॉल्स आलेत. फोनवर इतके मेसेज होते की, माझा फोन हँग झाला होता. आधी मला भीती वाटली, पण मी विचारात पडलो होतो की, असं काय झालं, ज्यामुळे इतके सारे फोन येत आहेत. त्यानंतर मी फोन पाहिला आणि तेव्हा मला समजले की, माझे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. माझ्यासाठी हा खूपच कठीण प्रवास होता. 18 महिन्यांनंतर मला कमबॅक करण्याची संधी मिलाली.”
खरं तर, पृथ्वी शॉ याने 2021मध्ये श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाकडून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यात तो पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. त्यानंतर त्याला संघात जागा मिळाली नव्हती. त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत राहिला. घरगुती क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉने चांगली कामगिरी करत भारतीय संघात पुनरागमन केले आहे. (cricketer prithvi shaw on comeback team india after 18 months ind vs nz t20 series 2023)
असे असले, तरीही न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात पृथ्वी शॉ बाकावर आहे. त्याला संधी देण्यात आली नाहीये.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20साठी भारतीय संघ-
शुबमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रांची टी20 मध्ये हार्दिक ‘टॉस का बॉस’! प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पृथ्वी बाकावरच
मोठी बातमी! भारतीय महिलांचा विश्वचषकात दबदबा, न्यूझीलंडला नमवत मिळवले फायनलचे तिकीट