स्थानिक क्रिकेट स्पर्धांच्या सामन्यांमध्ये घडणाऱ्या मारहाणीच्या घटना सामान्य असतात. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर असे कृत्य करणाऱ्या खेळाडूला मोठे परिणाम भोगावे लागू शकतात. परंतु स्थानिक किंवा समुदाय पातळीवरील नियम इतके कठोर नाहीत. न्यूझीलंडमध्ये सामुदायिक क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानावर खेळाडू मारहाण करताना दिसले. ही घटना २० मार्च रोजी घडली असून यामध्ये अर्शद बशीर नावाच्या ४१ वर्षीय खेळाडूच्या तोंडावर ठोसा लागल्यामुळे दुखापत झाली आहे. ऑकलंडच्या पाकुरांगा येथील मलॉयड एल्समोर पार्क येथे हा सामना खेळण्यात आला होता.
बशीर जेव्हा त्याच्या क्लब सबर्ब न्यू लिन क्रिकेट क्लब कडून गोलंदाजी करत होता, तेव्हा चेंडू वाईड होता की नाही, यावरून वादाला सुरुवात झाली. यावर बशीरने होविक पाकुरांगा क्रिकेट क्लबच्या खेळाडूंना बेईमानी करू नये असे सांगितले.
अरशद बशीर म्हणाला की, “पाकुरंगा क्रिकेट क्लबचा एक खेळाडू त्याच्याकडे आला आणि तो मला जे काही बोलला आहे ते परत बोल असे म्हटला. मी पुन्हा तेच बोललो, ज्यावर त्याने माझ्या तोंडावर ठोसा मारला. अचानक ठोसा मारल्यानंतर बशीर चक्कर येऊन जमिनीवर पडला आणि काही काळ त्याची शुध्द गमावली. या ठोशामुळे बशीरच्या नाकालाही तीव्र इजा झाली.”
बशीरने आपल्याबरोबर घडलेल्या घटनेविषयी सांगिताना म्हटले आहे की, “त्याने दोन्ही हातांनी माझी कॉलर पकडली मी त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न केला पण दुसर्याच क्षणी त्याने मला तोंडावर ठोसा दिला.” बशीरने या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली आहे. त्याने सांगितले की, “या घटनेमुळे त्याला टॅक्सी ड्रायव्हिंगमुळे संध्याकाळच्या वेळेत मिळणाऱ्या २०० ते ३०० डॉलर्स कमाईचा बळी द्यावा लागला.
मात्र, घटनेसंदर्भात चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. क्रिकेटर अरशद बशीर यांची मारहाण करणाऱ्या खेळाडूवर त्याच्या वागण्यामुळे बंदी घालण्यात यावी अशी त्यांची इच्छा व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या:
संपूर्ण कारकीर्दीत न जमलेला हा कारनामा सचिनने केला रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये
सलामीच्या स्थानासाठी या खेळाडूंना द्यावी पसंती, गावसकरांचा भारताला सल्ला
शाहरुखची केकेआर आली टेन्शनमध्ये, सामना एकहाती फिरवणाऱ्या या दिग्गज खेळाडूच्या सहभागावर प्रश्नचिन्ह