भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 स्पर्धेत शानदार कामगिरी केली. त्याने भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1ने विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तो फक्त क्रिकेटच्या मैदानावरच नाही, तर सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. अश्विन चाहत्यांच्या प्रश्नांचीही मजेशीर उत्तरे देत असतो. मात्र, त्याला सध्या एका ऍपच्या सुरक्षेची चिंता वाटत आहे. आर अश्विन ट्विटरवर जोरदार सक्रिय असतो. त्याने आता थेट ट्विटरचा मालक असलेल्या एलॉन मस्क याच्याकडे स्वत:ची प्रोफाईल सुरक्षित करण्यासाठी मागणी केली आहे.
आर अश्विन (R Ashwin) याने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील असणाऱ्या एलॉन मस्क (Elon Musk) याच्याकडे तक्रार केली आहे. अश्विन ट्वीट करत म्हणाला की, “ठीक आहे. मी 19 मार्चपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटला कशाप्रकारे सुरक्षित करू शकतो. मला पॉप-अप मिळत राहतात. मात्र, कोणतीही लिंक कोणत्याही स्पष्टतापर्यंत पोहोचत नाहीये. एलॉन मस्क गरजूंची मदत करून आनंदी आहेत. कृपया आम्हाला योग्य दिशा सांगा.”
खरं तर, मस्क याने भारतात ‘ट्विटर ब्लू’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही सुरक्षेचे बदलही झाले आहेत. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आता फक्त तेव्हाच उपलब्ध असते, जेव्हा कोणत्याही व्यक्तीने ट्विटर ब्लू सबस्क्राईब केले आहे. भारतात ब्लू टिक घेणे आणि प्रीमिअम सबस्क्रिप्शन सेवेच्या फीचर्सचा वापर करण्यासाठी मोबाईल युजर्सला प्रति महिना 900 रुपये द्यावे लागतील. तसेच, कंपनीने 650 रुपयांमध्ये कमी किंमतीचा प्रीमिअर सबस्क्रिप्शन प्लॅनही जारी केला आहे. हा प्लॅन वेब युजर्ससाठी आहे. हे शुल्क न भरणाऱ्या व्यक्तींकडून 19 मार्चनंतर ब्लू टिक पुन्हा काढून घेतले जाईल.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत चमकला अश्विन
अश्विन याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याने 4 सामन्यांच्या मालिकेत 25 विकेट्स घेतले. तसेच, तो मालिकेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही बनला. त्याने रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यासोबत संयुक्त मालिकावीर पुरस्कारही पटकावला. (cricketer r ashwin writes to elon musk on security of his twitter account ind vs aus test series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video- मोबाईलमध्ये रमलेल्या धवनने वडिलांना दिले नाही पाणी; संतापलेली बहीण म्हणाली, ‘पप्पा, हा खूप…’
अविश्वसनीय! हरमनप्रीतने भिरकावला चेंडू, पण सीमारेषेवर ‘सुपरवुमन’ हरलीनने पकडला अफलातून कॅच, पाहा Video






