भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. यानंतर भारतीय संघाला पुढील महिन्यात बांगलादेशचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला 3 सामन्यांची वनडे आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंचे संघात पुनरागमन होणार आहे. जडेजा यापूर्वी भारताच्या वनडे संघात निवडला गेला होता. मात्र, आता तो खेळणार नसल्याचे वृत्त आहे. कसोटीतही त्याच्या खेळण्यावर संशय व्यक्त केला जात आहे. जडेजा सध्या दुखापतीतून सावरत आहे. मात्र, दुखापतीनंतरही तो गुजरात विधानसभा निवडणुकीत पत्नी रिवाबा जडेजा हिच्यासाठी जोरदार प्रचार करताना दिसतोय.
चाहत्यांच्या निशाण्यावर जडेजा
रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरली आहे. अशात पत्नीच्या प्रचारादरम्यान रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. खरं तर, जडेजा सध्या रोड शो करताना दिसत आहे. यादरम्यान पोस्टरसाठी त्याचा जो फोटो वापरला गेला आहे, त्यामध्ये तो भारतीय संघाच्या जर्सीत दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर रवींद्र जडेजा ट्रोल (Ravindra Jadeja) होत आहे.
ભારતના ઓલ રાઉન્ડર ક્રિકેટર શ્રી @imjadeja નો રોડ શૉ તમે પણ જોડાશૉ.. २३/११/२०२२ pic.twitter.com/hQxQYZ2wZ2
— Rivaba Ravindrasinh Jadeja (@Rivaba4BJP) November 23, 2022
जडेजा आणि रिवाबाने पोस्टर केले होते शेअर
जडेजाची पत्नी रिवाबाने तिच्या ट्विटरवर अकाऊंटवर भारतीय संघाच्या जर्सीतील जडेजाचा रोड शोचा पोस्टर शेअर केला होता. हा फोटो जडेजानेही रिट्वीट केला होता. हा रोड शो 23 नोव्हेंबर रोजी होणार होता. रोड शो झाला खरा, पण त्यामुळे जडेजा भलताच ट्रोल झाला. आता विरोधी संघांनीही यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर युजर्स हे पोस्टर शेअर करत जडेजावर निशाणा साधत आहेत.
चाहत्यांनी केले ट्रोल
एका युजरने त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, एकाने लिहिले आहे की, “राजकीय प्रचारात भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा वापर करणे योग्य आहे का?” यासोबत त्याने बीसीसीआयलाही टॅग केले आहे. एका युजरने लिहिले की, “एका सक्रिय क्रिकेटपटूच्या रूपात तुम्हाला राजकीय पक्षात सामील होणे आमि राजकीय जाहिराती करण्याचीही परवानगी आहे का?” आणखी एकाने लिहिले की, “अव्यावसायिक! भाजप नेते निवडणुकीसाठी क्रिकेट संघाचा वापर करत आहे.” एका युजरने असेही लिहिले की, “देशासाठी खेळायचे असते, तेव्हा दुखापत झालीये आणि पत्नी, भाजपच्या प्रचाराच्या दिवशी ठणठणीत असतो. गजब.”
I am big fan(Sir Jadeja) but I want to dismissed from India's team because you has been greedy man
— Akay Yadav (@akayyadav8707) November 23, 2022
https://twitter.com/appshico/status/1595435109523619841
ग़ज़ब के लुटेरे है देश मैं 👌👌 देश के लिए खेलना हो तो चोट लगी हुई है और पत्नी , भाजपा का प्रचार का दिन भर होरा है , ग़ज़ब
— ajeet bhati🤗 (@Ajeetbhatiiyc) November 23, 2022
दुखापतीमुळे जडेजा संघातून बाहेर
जडेजा आशिया चषकानंतर दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. तो आशिया चषकादरम्यानच दुखापतग्रस्त झाला होता. तसेच, टी20 विश्वचषकातही तो भारतीय संघाचा भाग नव्हता. आता बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत निवडल्यानंतर त्याला तंदुरूस्त नसल्याचे कारण देत बाहेर केले. भारताचा बांगलादेश दौरा येत्या 4 डिसेंबरपासून होत आहे. 3 वनडे सामने खेळल्यानंतर 14 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. (cricketer ravindra jadeja trolled for using team india jersey in gujarat assembly election see reaction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयच्या कारवाईचे सत्र सुरूच, आणखी एका महत्वाच्या व्यक्तीची हकालपट्टी
जम्मू-काश्मीरचा जबरदस्त विक्रम! देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केली ‘अशी’ कामगिरी