Irfan Pathan On Rinku Singh: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. त्यात रिंकू सिंग याच्या नावाचाही समावेश आहे. अशात भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने रिंकूविषयी मोठे विधान केले आहे. त्याने रिंकूसाठी हा दौरा खूपच महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. त्याच्या मते, दक्षिण आफ्रिकेत ज्याप्रकारचे आव्हान मिळेल, ते कदाचित त्याच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असेल. मात्र, त्याने असेही म्हटले की, रिंकू या गोष्टींसाठी पूर्णपणे सज्ज आहे.
काय म्हणाला इरफान?
इरफान पठाण (Irfan Pathan) याच्यानुसार, रिंकू सिंग (Rinku Singh) ज्याप्रकारचा फलंदाज आहे, त्याला दक्षिण आफ्रिकेची खेळपट्टी खूपच आवडेल. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना इरफान म्हणाला, “मला वाटते की, रिंकू सिंगला वेग आणि उसळी आवडेल. कारण, तो ज्याप्रकारचा क्रिकेटपटू आहे, तो वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगल्याप्रकारे खेळतो. मला वास्तवात वाटते की, तो पूर्णपणे तयार आहे. खासकरून डावखुऱ्या हाताचा आणि आक्रमक फलंदाज असल्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते. त्याला माहिती आहे की, अशाप्रकारच्या संधीचा फायदा कसा घेतला जातो.”
नुकताच भारतीय संघाने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-1ने पराभव केला होता. या मालिकेत रिंकू सिंग (Rinku Singh) याची बॅट चांगलीच तळपली होती. त्याने अनेक सामन्यात महत्त्वाच्या खेळी करत संघाला विजयी केले होते. मात्र, आता रिंकू सिंग दक्षिण आफ्रिका (Rinku Singh South Africa) दौऱ्यावर आहे. इथे चेंडूला जास्त उसळीही मिळेल. अशात त्याच्यापुढे आव्हान आणखीच कठीण असणार आहे.
खरं तर, अलीकडेच रिंकू सिंगने टी20 विश्वचषक 2024 (Rinku Sing T20 World Cup 2024) स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने म्हटले होते की, जर त्याला टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली, तर तो प्रभाव टाकण्यासाठी तयार आहे. रिंकूनुसार, विश्वचषकात खेळणे त्याच्यासाठी मोठी गोष्ट असेल, ज्यासाठी तो चांगलीच मेहनत घेताना दिसत आहे. (cricketer rinku singh is ready for toughest test in south africa says irfan pathan)
हेही वाचा-
IPL: ‘इथं खाऊन घे नाहीतर…’, आशिष नेहराने गंभीरला खाऊ घातलेली ‘ती’ गोष्ट, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
‘IPLने Impact Player Rule रद्द करावा, भारतीय फलंदाज…’, माजी दिग्गजाने का दिला असा सल्ला? घ्या जाणून