इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील महत्त्वाच्या 68व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 1 धावेने पराभव केला. यासह लखनऊ संघ प्ले-ऑफचे तिकीट मिळवणारा हंगामातील तिसरा संघ ठरला. मात्र, या सामन्यात केकेआरने पराभव पत्करला असला, तरीही संघाचा युवा फलंदाज रिंकू सिंग याने त्याच्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. रिंकूने या सामन्यात केकेआरसाठी टिच्चून वादळी फलंदाजी केली. यादरम्यान रिंकूच्या नावावर खास विक्रमाच नोंदही झाली. यामध्ये त्याने एमएस धोनी आणि एबी डिविलियर्स यांनाही मागे टाकले.
रिंकूने टाकले धोनी-डिविलियर्सला मागे
लखनऊविरुद्ध रिंकूने 33 चेंडूत 67 धावा केल्या होत्या. यामध्ये 4 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. आयपीएलमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या दोन षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत रिंकू सिंग (Rinku Singh) सर्वात वरच्या स्थानी आहे. त्याने या हंगामात आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या दोन षटकात 277.8च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. याबाबतीत त्याने आरसीबीचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स (AB De Villiers) यालाही मागे टाकले आहे. डिविलियर्स आव्हानाचा पाठलाग करताना 239.7च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करायचा.
धोनी अन् रोहितही मागेच
यादीत तिसऱ्या स्थानी रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. त्याने आयपीएलमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या दोन षटकात 222.3च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. तसेच, रोहितसोबत संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी एमएस धोनी आहे. धोनीनेही 222.3च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. या यादीत चौथ्या स्थानी चेन्नईचा माजी खेळाडू एल्बी मॉर्केल आहे. त्याने 212.9च्या स्ट्राईक रेटने आयपीएलमध्ये अखेरच्या दोन षटकात फलंदाजी केली आहे.
अखेरच्या दोन षटकात सर्वाधिक स्ट्राईक रेटने फलंदाजी करणारे फलंदाज
रिंकू सिंग- 277.8
एबी डिविलियर्स- 239.7
रोहित शर्मा- 222.3
एमएस धोनी- 222.3
एल्बी मोर्कल- 212.9
केकेआरने 55 लाखात घेतलं संघात
केकेआर संघाने रिंकू सिंग याला 2018मध्ये 80 लाख रुपयांमध्ये ताफ्यात सामील केले होते. त्याला 2021पर्यंत केकेआरने रिटेन केले. मात्र, 2022च्या मेगा लिलावात त्याला मुक्त केले होते. तसेच, मेगा लिलावात त्याला पुन्हा केकेआरने ताफ्यात सामील केले. मात्र, यावेळी त्याला 55 लाख रुपयेच मिळाले. (cricketer rinku singh now has best strike rate in last two overs of ipl goes past ms dhoni and ab de villiers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अटीतटीच्या सामन्यात टॉसचा निकाल मुंबईच्या बाजूने, रोहितसेना हैदराबादला करणार का चीतपट?
IPL 2023चा 70वा सामना RCBसाठी खूपच महत्त्वाचा, फाफसेना काढणार गुजरातचा काटा? पाहा संभावित Playing XI