इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला असल्याचे दिसत आहे. यश्वस्वी जयसवाल ते ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंनी आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये आणखी एका खेळाडूच्या नावाचा समावेश होतो, तो खेळाडू म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स रिंकू सिंग होय. रिंकूने केकेआरसाठी फिनिशरची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. यानंतर अशी अटकळ बांधली जात आहे की, रिंकूला लवकरच भारतीय संघात जागा मिळू शकते. मात्र, आता यावर रिंकूने त्याचे मत मांडले आहे.
काय म्हणाला रिंकू?
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) याने म्हटले की, तो सध्या भारतीय संघातील निवडीविषयी विचार करत नाहीये. तो सध्या स्वत:वर काम करणे सुरू ठेवेल. आयपीएल 2023चा 68वा सामना कोलकाता नाईट रायडर्स वि. लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळला गेला. या सामन्यात केकेआरला 1 धावेने पराभूत व्हावे लागले. या सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना रिंकू म्हणाला की, अशाप्रकारचा हंगाम खेळणे चांगले, पण तो आता राष्ट्रीय संघातील जागेविषयी जास्त विचार करत नाहीये.
रिंकू म्हणाला की, “हंगाम अशाप्रकारचे जेव्हा जातो, तेव्हा आनंद होतो. मी भारतीय संघातील निवडीबाबत जास्त विचार करत नाहीये. आता जेव्हा मी घरी जाईल, तेव्हा दररोजचा सराव आणि जिम करेल. मी फक्त माझे काम करत राहील.”
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात रिंकूने अखेरच्या षटकात सलग पाच षटकार मारले होते. त्या खेळीला त्याने घरच्या मैदानावरील सर्वोत्तम खेळी म्हटले. त्यानंतर त्याला चांगली लोकप्रियता मिळाली. रिंकू म्हणाला की, “माझे कुटुंब खूप खुश आहे. लोक मला आधीही ओळखायचे. मात्र, मागील ज्या काही खेळी मी साकारल्या, त्यामुळे लोक मला आणखी ओळखू लागले. मात्र, जेव्हापासून मी गुजरातविरुद्ध पाच षटकार मारले, त्यानंतर लोक माझा आदर करू लागले आणि मला ओळखू लागले. हे सर्व पाहून आनंद होतो.”
रिंकूची हंगामातील कामगिरी
रिंकू या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा स्टार खेळाडू राहिला. त्याने 2 वेळच्या चॅम्पियन संघासाठी शानदार प्रदर्शन केले. त्याने आपल्या बॅटमधून संघाला अनेक महत्त्वाचे सामने जिंकून दिले.
रिंकू हा फक्त 25 वर्षांचा असून त्याने 14 सामन्यात 59.25च्या सरासरीने आणि 149.53च्या स्ट्राईक रेटने 474 धावा केल्या. रिंकूने शनिवारी (दि. 20 मे) लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्धही चांगली खेळी साकारली. त्याने 33 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या. या धावा करताना त्याने 4 षटकार आणि 6 चौकारही मारले. मात्र, संघाला अखेरच्या चेंडूवर 1 धावेने पराभवाचा धक्का बसला. (cricketer rinku singh On team india selection read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही त्याला हलक्यात…’, 33 चेंडूत 67 धावा चोपणाऱ्या रिंकूबाबत LSGचा कर्णधार कृणालचे लक्षवेधी भाष्य
‘आख्ख्या देशाला माहितीये…’, रिंकूचे कौतुक करताना मोठी गोष्ट बोलून गेला कॅप्टन नितीश राणा