क्रिकेटमध्ये अनेकदा पंचांकडून असे काही निर्णय घेतले जातात, ज्यामुळे मोठा वाद निर्माण होतो. तसेच, त्या निर्णयाची चर्चा जगभरात रंगते. असेच काहीसे आता तमिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेत घडले आहे. एका सामन्यादरम्यान चेंडू थेट स्टम्प्सला लागूनही मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला नाही. यामुळे दुसऱ्या संघाला नंतर पराभवाचा सामना करावा लागला. कारण, ज्यावेळी त्या फलंदाजाला बाद दिले पाहिजे होते, त्याने संघासाठी आणखी 34 धावांचा पाऊस पाडला. चला तर, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
टीएनपीएल स्पर्धेतील 18वा सामना सलेम स्पार्टन्स विरुद्ध लायका कोवई किंग्स (Salem Spartans vs Lyca Kovai Kings) संघात खेळला गेला. या सामन्यात स्पार्टन्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी कोवई किंग्स संघाच्या डावातील अभिषेक तन्वर टाकत असलेल्या तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर एस सुजय (S Sujay) याने फटका मारला. यावेळी चेंडू फॉरवर्ड पॉईंटच्या दिशेने गेला. तिथून क्षेत्ररक्षकाने चेंडू मारला, जो थेट स्टम्प्सला जाऊन लागला होता. यावेळी सुजय नॉन स्ट्राईक एंडवर होता, पण जेव्हा चेंडू लागला, तेव्हा तो क्रीझच्या आत होता. मात्र, त्याचा पाय हवेत होता.
अशात मैदानी पंचांना वाटले की, तो व्यवस्थित क्रीझच्या आत पोहोचला आहे. अशात खेळाडूंची अपील स्वीकारली नाही आणि सामना पुढे खेळवण्याची परवानगी दिली. मात्र, काही मिनिटांनी रिप्ले पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कारण, सुजय बाद झाला होता. तो जर त्याचवेळी बाद असता, तर त्याला 10 धावांवर तंबूचा रस्ता पकडावा लागला असता. मात्र, नंतर तो बाद होऊन तंबूत परतला, तेव्हा त्याची धावसंख्या 44 इतकी होती.
“It was out, why was not it referred?” ????
..#TNPLonFanCode pic.twitter.com/OnA20upedh
— FanCode (@FanCode) June 27, 2023
एस सुजयमुळे डावात मोठे अंतर निर्माण झाले. त्यानंतर लायका कोवई किंग्स संघाने मोठा विजय साकारला. कारण, यावेळी कोवई किंग्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 199 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सलेम स्पार्टन्स संघ 19 षटकात सर्व विकेट्स गमावत 120 धावाच करू शकला. त्यामुळे कोवई किंग्स संघाने 79 धावांनी दमदार विजय मिळवला. मात्र, पंचांचा निर्णय सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला. (cricketer s sujay was run out but is was not referred to 3rd umpire in tnpl)
महत्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटीत टॉसचा निकाल इंग्लंडच्या पारड्यात, कांगारुंचा हुकमी एक्का संघात परतला
पुणेरी बाप्पा की कोल्हापूर टस्कर्स, कुणाला मिळणार MPL Finalचे तिकीट, ‘क्वालिफायर 2’ सामना ठरणार निर्णायक