इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत सर्वाधिक मानधन घेऊन आपल्या खेळाने सर्वांना निराश करणारा खेळाडू म्हणजे सॅम करन होय. करन सध्या इंग्लंडमध्ये टी20 वायटॅलिटी ब्लास्ट स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू करन याने मंगळवारी (दि. 20 जून) सरे संघाकडून खेळताना वादळी फलंदाजी केली. यादरम्यान त्याने केलेल्या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
मंगळवारी लंडनच्या के ओव्हल मैदानावर सरे विरुद्ध ग्लॅमॉर्गन (Surrey vs Glamorgan) संघात सामना पार पडला. या सामन्यात सरेकडून खेळताना सॅम करन (Sam Curran) याने अवघ्या 22 चेंडूत 59 धावांचा पाऊस पाडला. त्यापूर्वी त्याने 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. या धावा करताना त्याने 3 चौकार आणि 6 षटकारांची बरसात केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर सरे संघाने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 238 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ग्लॅमॉर्गन संघ 20 षटकात 8 विकेट्स गमावत 157 धावाच करू शकला. त्यामुळे सरे संघाने हा सामना 81 धावांच्या फरकाने जिंकला. यावेळी करनने 4 षटके गोलंदाजी करताना 30 धावा खर्चून 1 विकेट नावावर केली.
प्रथम फलंदाजा करताना सरे संघाकडून करनव्यतिरिक्त विल जॅक्स याने 40 चेंजूत 2 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 69 धावा केल्या. तसेच, लॉरी इवान्सने 20 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 40 धावांचे योगदान दिले. यावेळी ग्लॅमरॉर्गन संघाकडून पीटर हॅटजोगलू याने 45 धावा खर्चून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
Sam Curran was in electric form with the bat last night ⚡️
His 59 from 22 helped Surrey to their third-highest T20 total ever – 238/5!#Blast23 pic.twitter.com/ymYCoQRux3
— Vitality Blast (@VitalityBlast) June 21, 2023
आव्हानाचा पाठलाग करताना ग्लॅमॉर्गन संघाने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. संघाने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 157 धावा केल्या. यावेळी ख्रिस कूक याने 28 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. तसेच, जो रूट (Joe Root) याचा भाऊ बिली रूटने 24 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. सरेसाठी कर्णधार ख्रिस जॉर्डनने 21 धावा खर्चून 4 आणि सुनील नरेन याने 25 धावा खर्चून 2 विकेट्स घेतल्या.
आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू
खरं तर, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या मिनी लिलावात पंजाब किंग्स याने सॅम करनवर सर्वाधिक 18.50 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते. मात्र, तो अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता. त्याने आयपीएलच्या 14 सामन्यात फक्त 10 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, फलंदाजी करताना 276 धावा केल्या होत्या. (cricketer sam curran made 59 runs in 22 balls hits 6 sixes video)
महत्वाच्या बातम्या-
सलग तीन पराभवांनंतर छत्रपती संभाजी किंग्स करणार का कमबॅक? 11व्या सामन्यात कोल्हापूरचे आव्हान
धक्कादायक! वर्ल्डकप क्वालिफायर सामन्यानंतर ‘या’ स्टेडिअमला आग, ICCने उचलले मोठे पाऊल