---Advertisement---

‘या’ पठ्ठ्याला मिळाली नाही कांगारूंना चोपण्याची संधी, पण IPLसाठी होतोय तयार; 32 सेकंदाचं वादळ पाहाच

On: मंगळवार, मार्च 21, 2023 9:46 PM
Sanju-Samson
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील मालिकांसाठी संजू सॅमसन या धुरंधर खेळाडूला संधी मिळाली नव्हती. मात्र, तो आता आगामी इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेसाठीच्या तयारीत व्यस्त झाला आहे. त्याने दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे उपचार घेतले आणि आता तो एकदम फिट झाला आहे. अशात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार असलेल्या संजूचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तो तडाखेबंद फटके मारताना दिसत आहे.

चाहत्यांसोबतच अनेकांना अशी आशा होती की, रिषभ पंत दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसन (Sanju Samson) याला संधी मिळेल. मात्र, त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत जागा मिळाली नाही. आता तो मैदानावर सराव करताना दिसत असून त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. स्वत:ला सॅमसनचा चाहता म्हणणाऱ्या एका ट्विटर युजरने 32 सेकंदाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून कदाचित गोलंदाजही चिंतेत पडू शकतात.

https://twitter.com/SanjuSamsonFP/status/1637332947991920641?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1637332947991920641%7Ctwgr%5E2d09fbc7209b9378c4f021c9a43f0d2860c784f3%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fiplt20%2Fnews%2Fwatch-sanju-samson-32-second-video-will-give-goosebumps-to-bowlers-ipl-2023%2Farticleshow%2F98854686.cms

टी20 क्रिकेटमधील धडाकेबाज फलंदाजांमध्ये संजू सॅमसनचा समावेश होतो. सॅमसन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान संघ मागील हंगामात अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र, त्याला हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून पराभवाचा धक्का बसला होता. स्पर्धेपूर्वी राजस्थानला अंतिम सामन्याचा दावेदार संघ मानले जात नव्हते. मात्र, राजस्थानने दमदार प्रदर्शन करत सर्वांना हैराण केले.

यावेळीही जेव्हा सॅमसनचा संघ मैदानावर उतरेल, तेव्हा मागील हंगामाप्रमाणेच यावेळीही संघाला अव्वलस्थानापर्यंत त्यांचा प्रयत्न असेल. विशेष म्हणजे, राजस्थान हा संघ आयपीएलचा पहिला विजेता संघ आहे. त्यांनी आयपीएलच्या उद्घाटनाच्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2008मध्ये पहिले-वहिले विजेतेपद पटकावले होते. त्यावेळीही शेन वॉर्न याच्या नेतृत्वातील राजस्थानला कमकुवत मानले गेले होते. मात्र, त्यांनी विजय मिळवू दाखवला. त्यानंतर पहिल्यांदा सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला.

आाता आयपीएल 2023 स्पर्धेत राजस्थान संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (cricketer sanju samson 32 second video will give goosebumps to bowlers ipl 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतात जाऊन ‘हा’ संघ जिंकणार विश्वचषक, माजी दिग्गजाच्या मते फक्त टीम इंडियाचे असेल आव्हान
विजयी भव! मुंबईचा बेंगलोरवर 4 विकेट्सने विजय, गुणतालिकेत पुन्हा पटकावले अव्वलस्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---