क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे असे म्हणतात. क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अशा काही घटना घडतात, तेव्हा या गोष्टीचा प्रत्यय येतो. असेच काहीसे आता पुन्हा एकदा घडले आहे. आयपीएल 2023च्या 53व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवन याने अर्धशतक झळकावले. मात्र, यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्यात तो विरोधी संघाच्या खेळाडूच्या मदतीला धावला. शिखर धवनने रहमानुल्लाह गुरबाजची मदत केली. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ही घटना पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाच्या डावातील 13व्या षटकात घडली. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून हे षटक वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) टाकत होता. मैदानावर शिखर धवन (Shikhar Dhawan) टिच्चून फलंदाजी करत होता. अशात वरुणने धवनला बाद करण्यासाठी दुसरा चेंडू लेग स्टंपवर फेकला. मात्र, वरुण आपली लाईन चुकला आणि चेंडू वाईड टाकला, पण यादरम्यानच यष्टीरक्षक रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) हा चेंडू पकडत असतानाच चेंडू थेट त्याच्या मांडीला जाऊन लागला.
चेंडू मांडीला लागताच अफगाणिस्तानचा खेळाडू गुरबाज वेदनेने विव्हळताना दिसला. यावेळी तो मैदानावर झोपला. अशात शिखर धवन लगेच त्याच्याकडे गेला आणि त्याची मदत करताना दिसला. यादरम्यानचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, गुरबाजला यावेळी गंभीर दुखापत झाली नाही आणि तो पुन्हा उभा झाला. तसेच, यष्टीरक्षकाची जबाबदारीही सांभाळताना दिसला.
https://twitter.com/FanIplt20/status/1655592523128246273?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1655592523128246273%7Ctwgr%5E8f460c6d19ebd482dfabbf5250f64568d582262f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fwatch-shikhar-dhawan-helps-rahmanullah-gurbaz-after-ball-hit-him-on-near-the-groin-122304
शिखर धवनचे अर्धशतक
या सामन्यात पंजाब किंग्सने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 179 धावा केल्या. या धावा करताना पंजाबकडून कर्णधार शिखर धवन याने 47 चेंडूत सर्वाधिक 57 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त इतर फलंदाज खास कामगिरी करू शकला नाही. धवनव्यतिरिक्त जितेश शर्मा आणि शाहरुख खान यांनी प्रत्येकी 21 धावा केल्या. शाहरुख यावेळी नाबाद राहिला. तसेच, ऋषी धवन (19), लियाम लिव्हिंगस्टोन (15) आणि प्रभसिमरन सिंग (12) यांनीही छोटेखानी खेळी साकारली. यावेळी कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त हर्षित राणाने 2, तर सुयश शर्मा आणि कर्णधार नितीश राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (cricketer shikhar dhawan helps rahmanullah gurbaz after ball hit him on near the groin)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धवनचा भीमपराक्रम! फिफ्टी मारताच रचले 2 रेकॉर्ड, एका विक्रमात विराटशी बरोबरी; लगेच घ्या जाणून
वयाच्या 37व्या वर्षी गब्बरचा नादच खुळा! कर्णधार म्हणून टी20 क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास विक्रम