वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार आहे. या विश्वचषकामध्ये भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी अनेक खेळाडू प्रयत्न करत आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा स्टार फलंदाज शिवम दुबे याच्या नावाचाही समावेश आहे. दुबेच्या नजरा वनडे विश्वचषकावर आहेत. त्याने नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला भारतीय विस्फोटक फलंदाज हार्दिक पंड्या आणि विजय शंकर यांच्याशी स्पर्धेबद्दल तसेच स्पर्धेविषयी प्रश्न विचारण्यात आले.
अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) याने यावेळी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून जागा मिळवण्यासाठी हार्दिक पंड्या आणि विजय शंकर यांच्याशी कोणतीही स्पर्धा असल्याचे नाकारले. तो म्हणाला की, त्याला इतरांवर नाही, तर स्वत:वर लक्ष देऊन विश्वचषकात भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे.
काय म्हणाला दुबे?
माध्यमांशी बोलताना दुबे म्हणाला की, “नक्कीच भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळवण्यावर नजर आहे. प्रत्येक खेळाडू विश्वचषकात खेळू इच्छितो, खासकरून जेव्हा स्पर्धा भारतात होत आहे. मात्र, मी फक्त स्वत:च्या प्रदर्शनावर लक्ष देऊ शकतो. इतर सर्व निवडकर्त्यांवर अवलंबून आहे.”
हार्दिक पंड्या आणि विजय शंकर (Hardik Pandya And Vijay Shankar) यांना आपला प्रतिस्पर्धी मानन्याच्या प्रश्नावर तो म्हणाला की, “नाही, माझा प्रतिस्पर्धी फक्त मी आहे. मी इतर खेळाडूंना पाहत नाही. मी मागील दिवसांपासून चांगला बनण्यासाठी प्रत्येक दिवशी प्रशिक्षण घेतो.”
दुबेचे आयपीएल प्रदर्शन
शिवम दुबेने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत 16 सामन्यात फलंदाजी करताना 158.33च्या स्ट्राईक रेटने आणि 38च्या सरासरीने 418 धावा केल्या आहेत. त्याने 106 देशांतर्गत टी20 सामन्यात 41 विकेट्स घेतल्या असूनही धोनीने त्याला एका खास फलंदाजाच्या रूपात वापरले. तसेच, सीएसके (CSK) संघासाठी दुबेने आपल्या दुसऱ्या हंगामात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पंड्या-शंकरशी सामना
आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि विजय शंकर (Vijay Shankar) यांच्याशी दुबेचा सामना झाला. शंकरने 14 सामन्यात 160.10च्या स्ट्राईक रेट आणि 37.62च्या सरासरीने 301 धावा केल्या. तसेच, पंड्याने 16 सामन्यात 136.75च्या स्ट्राईक रेटने आणि 31.45च्या सरासरीने 346 धावा केल्या.
दुबेविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघाकडून फक्त 1 वनडे सामना खेळला आहे. त्यात त्याला फक्त 9 धावा करता आल्या आहेत. तसेच, 13 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 9 डावात 17.50च्या सरासरीने आणि 136.36च्या स्ट्राईक रेटने 105 धावा केल्या आहेत.
दुबेने अलीकडील काळात आपल्या खेळात चांगली प्रगती केली आहे. त्याने भारतीय संघाकडून फेब्रुवारी 2020मध्ये अखेरचा सामना खेळला होता. आता त्याला वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (cricketer shivam dube reacts on comparison with hardik pandya and vijay shankar for spot in team india in world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
माजी सलामीवीराचे धक्कादायक विधान! पहिल्यांदाच भारतीय संघात निवडलेल्या तिलकबद्दल म्हणाला, ‘चुकीचा निर्णय…’
भारतीय संघाला मोठा झटका! टी20 मालिकेपूर्वीच स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, लगेच वाचा