---Advertisement---

‘सूर्य’ पुन्हा तळपला, वादळी अर्धशतकासह मोठा विक्रम नावावर; ठरलाय एकटाच भारतीय

Suryakumar-Yadav
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतून भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भूई थोडी केली. यात केएल राहुलचे अर्धशतक आणि सूर्यकुमार यादव याच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेसमोर भलेमोठे आव्हान ठेवले.

या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या भारताकडून सर्वच फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. मात्र, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने वादळी अर्धशतकासह खास विक्रमही केला. सूर्यकुमार याने या सामन्यात अवघ्या 25 चेंडूत 61 धावा चोपल्या. या धावा चोपताना त्याने 4 षटकार आणि 6 चौकारही मारले. यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. विशेष म्हणजे, असा विक्रम भारताच्या कुठल्याही फलंदाजाला जमला नव्हता.

सूर्यकुमार यादव याने या सामन्यात अर्धशतक झळकावत एका वर्षात टी20 क्रिकेटमध्ये (आंतरराष्ट्रीय स्तरावर) एक हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. महत्त्वाचं म्हणजे, सूर्यकुमार यादवपूर्वी पाकिस्तानच्या एका खेळाडूने असा कारनामा केला होता. पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज मोहम्मद रिझवान याने 2021 साली एका वर्षात टी20 क्रिकेटमध्ये 1000 धावा चोपण्याचा कारनामा केला होता. अशात रिझवाननंतर अशी कामगिरी करणारा सूर्या जगातील दुसरा फलंदाज बनला.

भारताचा डाव
भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सर्वाधिक 186 धावा केल्या आणि झिम्बाब्वेला 187 धावांचे आव्हान दिले. भारताकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवव्यतिरिक्त केएल राहुल यानेही अर्धशतक झळकावले. त्यांच्याव्यतिरिक्त विराट कोहली (26), हार्दिक पंड्या (18) आणि रोहित शर्मा (15) यांनीही खारीचा वाटा उचलला. झिम्बाब्वेकडून शॉन विलियम्स याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 2 षटकात 9 धावा देत 2 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याच्याव्यतिरिक्त सिकंदर रझा, ब्लेसिंग्स मुझरबानी आणि रिचर्ड नगारवा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय फलंदाजांनी चोपलं रे! झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना चोप देत भारत 20 षटकांअखेर 5 बाद 186
केएल राहुलच्या शिरपेचात मानाचा तुरा! अर्धशतक ठोकताच ‘या’ विक्रमात बनला तिसरा भारतीय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---