जागतिक क्रिकेटमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत महिला क्रिकेटपटूही आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. आता नव्या युगाच्या क्रिकेटमध्ये नवीन प्रतिभावान खेळाडू समोर आली आहे. ही प्रतिभावान खेळाडू थायलंडची आहे. थायलंड दौऱ्यावर आलेल्या झिम्बाब्वे संघाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 19 वर्षीय फिरकी गोलंदाज थिपाचा पुथावोंग हिने खतरनाक गोलंदाजी करत विरोधी संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळवण्यात सिंहाचा वाटा उचलला.
बँकॉक येथे बुधवारी (दि. 19 एप्रिल) खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात थायलंडने प्रथम फलंदाजी करताना फक्त 154 धावांचे आव्हान उभे केले होते. 50 षटकांच्या या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना उतरलेला झिम्बाब्वे संघ थिपाचा पुथावोंग (Thipatcha Putthawong) हिच्या शानदार गोलंदाजीच्या जाळ्यात अडकून 24.1 षटकात 10 विकेट्स गमावत 76 धावाच करू शकला. त्यामुळे थायलंड महिला संघाला 78 धावांनी मोठा विजय मिळवण्यात यश आले. या विजयासोबतच थिपाचाने इतिहासही रचला.
RESULTS | THA V ZIM | ODI 1 |
THAILAND WOMEN WON BY 76 RUNS
Full match : https://t.co/2q53YIi9mf
Scorecard : https://t.co/liV542cjW3#THAvZiM #letsgothailand🇹🇭 #ODI #internationalseries @zimbabwewomen @ICCMediaComms @ACCMedia1 @ICC pic.twitter.com/QG7AYDjI53
— Cricket Thailand (@ThailandCricket) April 19, 2023
सर्वोत्तम गोलंदाजी करणारी जगातील सहावी खेळाडू
थिपाचा पुथावोंग हिने एकूण 6.1 षटकात फक्त 6 धावा खर्च करत 6 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे थिपाचा ही महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी करणारी जगातील सहावी गोलंदाज बनली. यासोबतच ती हा कारनामा करणारी आपल्या देशाची पहिली गोलंदाज बनली.
Figures of 6/6 in an ODI 😲
Thailand's Thipatcha Putthawong enjoys a dream day against Zimbabwe, while across the Indian Ocean, Uganda host a five-team T20I tournament 🏏https://t.co/bZEW1BaDrZ
— ICC (@ICC) April 20, 2023
थिपाचाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर थायलंड महिला संघाचे नाव वनडे क्रिकेटच्या इतिहासात नोंदवले गेले. यापूर्वी थायलंड महिला संघाकडून अशी कामगिरी करण्यात आली नव्हती. तसं पाहिलं, तर एकूण विक्रमाबाबत बोलायचं झालं, तर महिला वनडे क्रिकेटच्या एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रम पाकिस्तानची गोलंदाज साजिदा शाह हिच्या नावावर आहे. तिने 2003मध्ये 8 षटकात 4 धावा खर्च करून 7 विकेट्स घेतल्या होत्या. आजपर्यंत तिचा हा विक्रम कोणतीही महिला गोलंदाज मोडू शकली नाहीये.
मोडला 41 वर्ष जुना विक्रम
थिपाचा हिने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर जवळपास 41 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. खरं तर, 14 जानेवारी, 1982 रोजी न्यूझीलंडची गोलंदाज जॅकी लॉर्ड हिने भारतीय महिला संघाविरुद्ध ऑकलंड येथे 8 षटकात 10 धावा खर्च करत 6 विकेट्स घेतल्या होत्या. थिपाचाने तिच्या गोलंदाजी कामगिरीने हा विक्रम मोडला. त्यामुळे ती सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी करणारी आठवी सर्वात युवा गोलंदाज बनली.
कोण आहे थिपाचा पुथावोंग?
विशेष म्हणजे, 19 वर्षीय थिपाचा पुथावोंग हिने आतापर्यंत फक्त 5 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये तिने 10 विकेट्स चटकावल्या आहेत. तसेच, तिने 24 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या आहेत. (cricketer thipatcha putthawong became sixth bowler to have best figures in womens odi cricket history)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘काय माहिती RCBने चहलला का रिलीज केलेलं’, इंग्लंडच्या दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न
आयपीएल 2023 मध्ये ‘या’ संघांनी नवीन कर्णधार नेमून केली मोठी चूक! पाहा आकडेवारी