टी२० विश्वचषक २०२१मधील पराभव भारतीय चाहते पचवू शकलेले नाहीयेत. तेवढ्यात आता टी२० विश्वचषक २०२२ जवळ आलाय. सर्व संघ या वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या तयारीत मग्न आहेत. अशात आयसीसीने २०२४ साली होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठीची योजनाही सुरू केली आहे. आयसीसीने सोमवारी (दि. ११ एप्रिल) २०२४च्या हंगामासाठीचे यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिजला दिले आहे. यजमानपदाचा अर्थ असा की, वेस्ट इंडिजसह अमेरिकेचा क्रिकेट संघदेखील २०२४च्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. अशात भारताकडून खेळणारा उन्मुक्त चंदही या विश्वचषकात भारतीय संघाविरुद्ध खेळताना दिसू शकतो.
भारताविरुद्ध खेळताना दिसू शकतो उन्मुक्त चंद
यूएसए संघाने २०२४ टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरत इतिहास रचला आहे. मागील काही वर्षांपासून अमेरिका क्रिकेट संघात कोरी अँडरसन, रस्टी थेरॉन आणि भारतीय संघाचा माजी खेळाडू उन्मुक्त चंदसारखे (Unmukt Chand) अनेक मोठे खेळाडू सामील झाले आहेत. हे खेळाडू पुढील टी२० विश्वचषकात आपापल्या संघाविरुद्ध खेळताना दिसू शकतात. यूएसए क्रिकेटने स्वत:च या गोष्टीची माहिती दिली आहे की, यूएसए संघ २०२४ टी२० विश्वचषकासाठी क्वालिफाय झाला आहे. अशात भारतीय संघाला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद भारताविरुद्ध खेळताना दिसू शकतो. आयसीसीच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर उन्मुक्त चंद जोरदार ट्रेंड होत आहे.
HUGE NEWS!!!
The @ICC has today confirmed automatic qualification for #TeamUSA🇺🇸 as co-host of ICC Men's T20 World Cup 2024 alongside West Indies!!
FULL DETAILS➡️: https://t.co/2y8kc4k7ty#T20WorldCup🏏 #WeAreUSACricket🇺🇸 pic.twitter.com/KDc26Rjyk1
— USA Cricket (@usacricket) April 10, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
युजर्सचे ट्वीट-
एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “यूएसए पुढील आयसीसी टी२० विश्वचषकासाठी क्वालिफाय झाला आहे. म्हणजे आता उन्मुक्त चंद भारतीय संघाविरुद्ध खेळू शकतो.”
USA qualified for the next t20i WC
So Unmukt Chand may play against India then 😄 @UnmuktChand9 pic.twitter.com/oqmorWbib5
— Bibhu (@Bibhu224) April 11, 2022
Unmukt Chand, Corey Anderson (ex-NZ) and some ex-SA players may play against their own countries :))) https://t.co/U1xa0ITMvH
— Saumya Narain (@Freak1411) April 12, 2022
वयाच्या २८व्या वर्षी घेतली होती निवृत्ती
आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला २०१२ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून देणारा फलंदाज उन्मुक्त चंदने वयाच्या २८व्या वर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. उन्मुक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली आणि उत्तराखंड संघांकडून खेळला आहे. यानंतर तो थेट अमेरिकेत स्थायिक झाला होता. भारतात दीर्घ काळ संघर्ष केल्यानंतर उन्मुक्तने बीसीसीआयला आपल्या निवृत्तीचा निर्णय सांगितलेला. त्यानंतर त्याने अमेरिकाकडून खेळणे सुरू केले.
हेही वाचा- पुढचा विराट म्हटला गेलेला उन्मुक्त चंद अचानक गायब कसा झाला?
उन्मुक्तने ६७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ३१.५७च्या सरासरीने ३३७९ धावांचा पाऊस पाडला आहे. तसेच, त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये त्याने १२० सामने खेळले आहेत. यावेळी त्याने ४१.३३च्या सरासरीने ४५०५ धावा कुटल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बेंगलोरने सामना गमावला, पण विराटने जिंकली सर्वांची मने; संघर्ष करणाऱ्या ऋतुराजला केले प्रेरित
IPL2022| मुंबई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL 2022| चेन्नईने ‘या’ विक्रमात अव्वलस्थानी असलेल्या बेंगलोरला गाठलेच! मुंबई-पंजाब अद्याप खूप दूर