जगात अनेक टी20 लीग स्पर्धे खेळवल्या जातात. जसे की, आयपीएल, बीबीएल, सीपीएल आणि बऱ्याच. यामध्ये बीपीएल स्पर्धेचाही समावेश आहे. बीपीएल म्हणजेच बांगलादेश प्रीमिअर लीग होय. या स्पर्धेत पहिल्यांदाच कोणताही भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहे. तो खेळाडू म्हणजेच भारताला 2012मध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार उन्मुक्त चंद होय. उन्मुक्त बीपीएल स्पर्धेत सहभागी झालेला पहिला भारतीय खेळाडू बनला. विशेष म्हणजे, त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
बुधवारी (दि. 23 नोव्हेंबर) 29 वर्षीय उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याला चट्टोग्राम चॅलेंजर्स (Chattogram Challengers) संघाने बीपीएल 2023 (BPL 2023) स्पर्धेसाठी खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये निवडले.
https://www.facebook.com/ctg.challengers/posts/561143832690291
जवळपास एक आठवड्यापूर्वी उन्मुक्तने बीपीएलसाठी अर्ज केला होता. तसेच, त्याने म्हटले होते की, तो या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खूपच उत्साही होता. सध्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) मध्ये क्रिकेटचा भाग असलेल्या या अनुभवी खेळाडूने बीपीएलला जगातील सर्वात लोकप्रिय लीग म्हटले आहे.
मागील वर्षी उन्मुक्त हा बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेत भाग घेणारा पहिला भारतीय खेळाडू बनला. त्याला गुणतालिकेत तळाशी असलेल्या मेलबर्न रेनेगेड्स संघाने आपल्या ताफ्यात सामील केले होते. 2021मध्ये उन्मुक्तने यूएसएमध्ये क्रिकेट कारकीर्द घडवण्यासाठी भारत देश सोडला होता. 2012 मध्ये भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा तो कर्णधार होता. त्याने भारताला आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियामध्ये हा विश्वचषक जिंकून दिला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने शानदार शतक झळकावत सामनावीर पुरस्कारही पटकावला होता.
बीपीएलबद्दल बोलायचं झालं, तर चट्टोग्राम चॅलेंजर्स संघाने नेदरलँडचे मॅक्स ओडौड, आयर्लंडचा कर्टिस कॅम्फर आणि श्रीलंकेचा विश्वा फर्नांडो आणि आशान प्रियरंजन या परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील केले आहे.
बीपीएल 2022च्या हंगामात चॅलेंजर्स संघ 10 पैकी 5 सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी होता. (cricketer Unmukt Chand to play for Chattogram Challengers in Bangladesh Premier League 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सची ताकद होणार दुप्पट! आयपीएल 2023पूर्वी आर्चरने सुरू केला सराव
‘आमच्याकडे कितीही पैसे असले तरी आम्ही सूर्यकुमार यादवला बीबीएलमध्ये…’, ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलूचे विधान