सलग चार पराभवांचा सामना करत कोलकाता नाईट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या 36व्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. कोलकाताने बेंगलोरला 21 धावांनी धूळ चारली. हा कोलकाताचा हंगामातील तिसरा विजय होता. चार सामन्यांनंतर कोलकाताला विजय मिळवून देण्यात फलंदाज आणि गोलंदाजांनी सिंहाचा वाटा उचलला. वरुण चक्रवर्ती सामन्याचा हिरो ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, वरुण चक्रवर्तीने पत्नी आणि मुलाला सामनावीर पुरस्कार समर्पित केला.
वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) याने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून शानदार गोलंदाजी केली. त्याने यावेळी 4 षटके गोलंदाजी करताना 27 धावा खर्च करत 3 विकेट्स चटकावल्या. त्याने ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक या मोठ्या खेळाडूंना तंबूत धाडले. त्यामुळे तो विजयाचा हिरो ठरला. अशात सामनावीर पुरस्कार मिळताच त्याने नवजात मुलगा आत्मन (Aathman) आणि पत्नी नेहा खेडेकर (Neha Khedekar) यांना समर्पित केला. त्याच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
For his economical spell of 3/27, @chakaravarthy29 becomes the Player of the Match in the #RCBvKKR contest 👏🏻👏🏻
Scorecard ▶️ https://t.co/o8MipjFKT1 #TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/VrAjqvDbSM
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2023
पुरस्कार पटकावल्यानंतर वरुण म्हणाला की, “क्रिकेट असाच आहे. मागील सामन्यात माझ्याविरुद्ध 49 धावा चोपल्या होत्या आणि आज मला हा पुरस्कार मिळाला आहे. माझे लक्ष्य हे माझ्या अचूकतेवर आहे. अधिक विविधता आणण्यावर नाही. मी यावर खूप काम करत आहे. मी एसी प्रतिबान आणि अभिषेक नायक यांना धन्यवाद देऊ इच्छितो. मी हा पुरस्कार माझ्या नवजात मुलाला आणि पत्नीला समर्पित करू इच्छितो. आता मी त्यांना आयपीएलनंतरच भेटेल.”
.@chakaravarthy29 kept things tight with the ball in the chase with his three-wicket haul & he becomes our 🔝 performer from the second innings of the #RCBvKKR match in the #TATAIPL 👌🏻👌🏻
A look at his bowling summary 🔽 pic.twitter.com/3yeVlBKeXz
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2023
वरुण चक्रवर्तीचे लग्न
वरुण चक्रवर्ती याने 11 डिसेंबर, 2020 रोजी गर्लफ्रेंड नेहा खेडेकर हिच्यासोबत संसार थाटला होता. काही महिन्यांपूर्वी तो वडील बनला आहे. त्याने त्याच्या मुलाचे नाव आत्मन ठेवले आहे. आयपीएलपूर्वी त्याने त्याच्या मुलासोबतचा गोंडस फोटोही शेअर केला होता.
https://www.instagram.com/p/CpSiF2Wtqoi/?utm_source=ig_embed&ig_rid=a089ec9d-8e23-4793-9631-16a89086a810
पराभवाचे सत्र कोलकाताने मोडले
बेंगलोरमध्ये खेळण्यात आलेल्या आयपीएल 2023च्या 36व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 200 धावा केल्या होत्या. यामध्ये जेसन रॉय (56) आणि नितीश राणा (48) यांच्या खेळीचे मोठे योगदान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने 8 विकेट्स गमावत 179 धावा केल्या होत्या. यामध्ये वरुणने 3 विकेट्स, सुयश शर्मा आणि आंद्र रसेल यांच्या प्रत्येकी 2 विकेट्सचाही समावेश होता. (cricketer varun chakravarthy dedicate player of the match award to newborn son aathman and wife neha )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चार पराभवांनंतर मिळवलेल्या दणदणीत विजयाने कॅप्टन राणा खुश; म्हणाला, ‘आम्हाला माहिती होतं…’
‘टी20, वनडे किंवा कसोटी, विराटचा दर्जाच वेगळा…’, कोहलीबद्दल दिग्गजाचे मन जिंकणारे वक्तव्य