देशांतर्गत क्रिकेटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी भारतीय संघासाठी खेळलेला आणि मध्यप्रदेश संघासाठी घरगुती क्रिकेट खेळणारा अष्टपैलू व्यंकटेश अय्यर याच्याशी संबंधित आहे. व्यंकटेशला गंभीर दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याला पुढील काही आठवडे मैदानापासून दूर राहावे लागणार आहे. व्यंकटेशच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. तसेच, त्याच्या घोट्याला प्लॅस्टर करण्यात आले आहे. तो दोन महिन्यांसाठी बाहेर जाण्याची शक्यता आहे, पण मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनला अपेक्षा आहे की, तो सहा आठवड्यात बरा होईल. तो रणजी ट्रॉफीसह महत्त्वाच्या स्पर्धांना मुकू शकतो.
व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याने भारताकडून 2 वनडे आणि 9 टी20 सामने खेळले आहेत. त्यालाही हे माहिती नाही की, तो मैदानावर आता कधी परतेल. त्याने गुरुवारी (दि. 20 ऑक्टोबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना तो म्हणाला की, “हे खरोखर निराशाजनक आहे. मी लवकरच या ऍक्शनचा भाग बनू शकत नाही. मला माहिती नाही की, मी या दुखापतीतून कधीपर्यंत बरा होईल. मात्र, मी यावेळी घरी जाईल आणि तंदुरुस्त होण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला (NCA) जाण्यापूर्वी एक महिना आराम करेल. मला अपेक्षा होती की, मी मध्यप्रदेशला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा जिंकण्यात मदत करेल.”
व्यंकटेश सध्या राजकोटमध्ये आहे आणि त्याला ही दुखापत कोणत्याही सामन्यादरम्यान आली नाहीये. काही खेळाडूंचे असे म्हणणे आहे की, नेट सेशनदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला. तो विदर्भ संघाविरुद्ध गुरुवारी मध्यप्रदेशच्या सामन्यात भाग घेऊ शकला नाही. हा सामना विदर्भने 22 धावांनी आपल्या नावावर केला.
व्यंकटेश अय्यरची शानदार कामगिरी
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) व्यंकटेश अय्यर याने शानदार कामगिरी केली होती. त्याने 4 सामन्यात फलंदाजी करताना 63च्या सरासरीने 189 धावा चोपल्या होत्या. यावेळी त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतकेही निघाली. तसेच, गोलंदाजी करताना त्याने एका सामन्यात फक्त 20 धावा खर्च करत 6 विकेट्स घेण्याची मोठी कामगिरी केली होती. आता तो कधीपर्यंत बरा होतोय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बड्डे आहे भावाचा! सचिनने सेहवागला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, इथेही केली सिक्सर मारण्याची विनंती
आख्ख्या जगाच्या शुभेच्छा एकीकडे अन् सूनबाईंच्या शुभेच्छा एकीकडे, मयंतीची अध्यक्ष बिन्नींंसाठी खास पोस्ट