सामन्यात परिस्थिती कशीही असो, भारतीय संघाचे काही खेळाडू त्यांच्या मजेशीर अंदाजासाठी ओळखळे जातात. त्यामध्ये विराट कोहली याच्या नावाचाही समावेश होतो. सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. इंदोरमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटीदरम्यान विराटचा असाच अंदाज पाहायला मिळाला. इंदोर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रादरम्यान विराट मैदानात डान्स करताना दिसला. त्याने त्याचे डान्स मूव्हज तेव्हा दाखवले, जेव्हा सामन्यातील ऑस्ट्रेलियाचा पगडा मजबूत होत चालला होता. यादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या सत्रातच सर्वबाद झाला होता. भारताचा पहिला डाव 33.2 षटकात 109 धावांवर संपुष्टात आला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने पहिली विकेट लवकर गमावली. मात्र, त्यानंतर संघाने टिच्चून फलंदाजी केली. ज्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या 1 बाद 41 धावा होती आणि दबाव भारतीय संघावर होता, तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) अतरंगी डान्स स्टेप्स करताना दिसला. त्याला पाहून प्रेक्षकांनीही टाळ्यांचा कडकडाट केला.
https://twitter.com/CricCrazyNIKS/status/1630850130206396416?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1630850130206396416%7Ctwgr%5E2cd725dd9eeed5e7020d0bb9b42e3d41cbe705c5%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Fvirat-kohli-dancing-during-australia-innings-in-ind-vs-aus-3rd-test-indore-holkar-stadium-2347247
तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 (Border-Gavaskar Trophy 2023) कसोटीतील सुरुवातीचे दोन सामने जिंकून भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. मात्र, तिसऱ्या कसोटीत संघाला संघर्ष करावा लागत आहे. भारतीय संघाने इंदोरमध्येही नागपूर आणि दिल्ली कसोटीप्रमाणे फिरकी खेळपट्टी तयार केली, पण इथे ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्या.
ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुह्नेमन, नेथन लायन आणि टॉड मर्फी या त्रिकुटाने भारतीय संघाला पहिल्या डावात 109 धावांवर रोखले. कुह्नेमनने विकेट्सचे पंचक पूर्ण केले. तसेच, लायनने 3, तर मर्फीने 1 विकेट नावावर केली. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजीला आला असता भारताकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजा चमकला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 54 षटकात 4 विकेट्स गमावत 156 धावा चोपल्या. त्यांच्याकडे सामन्यात 47 धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाच्या चारही विकेट्स घेण्याचा पराक्रम जडेजाने केला. (cricketer virat kohli dancing during australia innings in ind vs aus 3rd test indore holkar stadium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणणाऱ्या पंतची अपघाताच्या 2 महिन्यांनंतर मोठी प्रतिक्रिया; काय म्हणाला वाचाच
कोहलीने ज्यासाठी 107 कसोटी खेळल्या, ती कामगिरी उमेश यादवने 55 सामन्यात दाखवली करून