बांगलादेश विरुद्ध भारत संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (दि. 07 डिसेंबर) ढाका येथे पार पडला. या सामन्यात बांगलादेश संघाचे पारडं जड असल्याचं दिसलं. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यामुळे डावाची सुरुवात विराट कोहली याने केली. विराटने पहिल्याच चेंडूवर जबरदस्त चौकार मारत संघाला 4 धावा मिळवून दिल्या. यानंतर प्रेक्षकांना वाटले की, तो पुढेही ही कामगिरी करेल. मात्र, तो काही खास कामगिरी करू शकला नाही. टी20 विश्वचषक गाजवणारा विराट या सामन्यात फक्त 5 धावा करून बाद झाला.
विराट कोहली (Virat Kohli) याला इबादत हसन (Ibadot Hossain) याने तंबूचा रस्ता दाखवला. स्वस्तात बाद झाल्यामुळे विराटच्या वनडे फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. विराट मागील 7 वनडे डावांमध्ये ही चौथी वेळ आहे, जेव्हा विराट साध्या 10 धावांचा आकडाही पार करू शकला नाही.
इबादत हसनने विराटला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू फेकला. हा चेंडू विराटने पुल मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा चेंडू बॅटच्या खालील बाजूस स्पर्श करत स्टंपवर जाऊन लागला. मागील 7 वनडे डावांमध्ये विराटच्या बॅटमधून एकूण 73 धावा निघाल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ही 10.42 धावा राहिली आहे.
मागील 7 वनडे सामन्यात विराट कोहलीची कामगिरी
5
9
17
16
0
18
8
Virat Kohli in the last 7 ODIs:
5
9
17
16
0
18
8— Huzaifa Chaudhary (@Huzaifa12916549) December 7, 2022
https://twitter.com/jaydawda/status/1600472310255063041
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात विराट फक्त 9 धावा करून तंबूत परतला होता. त्या सामन्यात भारताला 1 विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता. विराट 2022मध्ये 10 वनडे डावात फक्त 189 धावाच करू शकला आहे. ही त्याच्या संपूर्ण कारकीर्दीतील तिसरी सर्वाधिक कमी वनडे सरासरी असणारे वर्ष आहे.
एका वर्षातील विराटची सर्वात कमी वनडे सरासरी
18.9 सरासरी- 2022*
31.8 सरासरी- 2008
36.6 सरासरी- 2015
सामन्याबद्दल थोडक्यात
भारतीय संघाला दुसऱ्या वनडेत बांगलादेश संघाने निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावत 271 धावा केल्या होत्या. तसेच, भारताला विजयासाठी 272 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पार करताना भारतीय संघाचा डाव 34 षटकात 4 विकेट्स गमावत 163 धावांवर होता. इथून पुढे भारताला 109 चेंडूत 96 धावांचे आव्हान होते. (cricketer virat kohli dismissed on 5 off 6 balls by ebadot hossain in 2nd odi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नादच खुळा! उमरानच्या वेगापुढे बांगलादेशचा शांतोही झाला शांत, वेग होता ताशी 151 किमी
नाद करा पण आमचा कुठं! भारतीय गोलंदाजांना चोप देत मेहिदी हसनचे शतक, नावावर खास विक्रमाची नोंद