सध्याच्या काळात भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांची लोकप्रियता सातासमुद्रापार पसरली आहे. या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्या नावाचाही समावेश आहे. विराट हा सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोव्हर्स असणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू आहे. विराटचे सोशल मीडियावर एकापेक्षा एक चाहते आहेत. मात्र, त्याचा एक चाहता सुंदर कलाकृतीमुळे भलताच चर्चेत आला आहे. या चाहत्याने माचिसचे डब्बे आणि काड्यांपासून विराटची रचना बनवली आहे.
खरं तर, विराट कोहली (Virat Kohli) याच्या या चाहत्याचे नाव शिंटू मौर्या (Shintu Mourya) आहे. हा चाहता पेशाने एक आर्टिस्ट आहे. नुकतेच त्याने त्याच्या अनोख्या कलेचे दर्शन घडवले. याचा व्हिडिओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत शिंटू माचिसचे डब्बे आणि त्याच्या काड्यांच्या मदतीने एक रचना तयार करताना दिसत आहे. ज्यावेळी ही रचना बनून तयार होते आणि यामधून प्रकाश जातो, तेव्हा भिंतीवर विराट कोहलीची प्रतिमा तयार होते. ही रचना बनवण्यासाठी चाहत्याला एकूण 3 दिवसांचा कालावधी लागला आहे.
https://www.instagram.com/reel/CtRaF0go6oA/?utm_source=ig_embed&ig_rid=fbd8b724-6bbf-4f9f-b11d-5d02ac8c3ed7
विराट कोहली याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो सध्या पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्यासोबत लंडनमध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. विराट मागील दीर्घ काळापासून सातत्याने क्रिकेट खेळत होता अशात त्याच्यासाठी हा ब्रेक खूपच गरजेचा होता. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिज संघाचा दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वनडे संघाची आधीच घोषणा झाली आहे. या दोन्ही संघांमध्ये विराटच्या नावाचा समावेश आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धची विराटची आकडेवारी
भारतीय दिग्गज फलंदाज विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध 2011 ते 2019 दरम्यान 14 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 19 डावात 43.26च्या सरासरीने 822 धावांचा पाऊस पाडला आहे. या धावा करताना त्याने 2 शतके आणि 5 अर्धशतकेही केली आहेत. याव्यतिरिक्त 2009 ते 2022 यादरम्यान त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 42 वनडे सामने खेळले आहेत. यातील 41 डावात त्याने 66.50च्या सरासरीने 2261 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतके आणि 11 अर्धशतकांचाही समावेश आहे. (cricketer virat kohli fan made beautiful structure match boxes matchsticks see video)
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकापूर्वी आफ्रिदीने इंग्लंडमध्ये दाखवला इंगा, पहिल्याच ओव्हरमध्ये घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स, Video
मोठी बातमी! दिग्गज गोलंदाजाने केला भारताच्या मुख्य निवडकर्ता पदासाठी अर्ज, बीसीसीआयकडून पगारातही वाढ