---Advertisement---

‘तू माझ्या कुटुंबाला शिवी दिली’, विराट आणि गंभीरमध्ये काय बाचाबाची झाली? एका क्लिकवर घ्या जाणून

On: बुधवार, मे 3, 2023 9:38 AM
Gautam-Gambhir-And-Virat-Kohli
---Advertisement---

सोमवारी (दि. 1 मे) आयपीएल 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळण्यात आलेला सामना बेंगलोर संघाने 18 धावांनी जिंकला. मात्र, हा सामना बेंगलोरच्या विजयापेक्षा जास्त विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या भांडणामुळे चर्चेत राहिला होता. आता या प्रकरणाविषयी मोठी माहिती समोर आली आहे. या बाचाबाचीदरम्यान शिवीगाळही करण्यात आली होती, ज्यामुळे गौतम गंभीर खूपच रागात दिसला होता.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला होता. त्यात दिसले होते की, काईल मेयर्स आणि विराट कोहली सामन्यानंतर थोडा वेळ एकत्र चालत आहेत. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, काईल मेयर्स (Kyle Mayers) विराट कोहली (Virat Kohli) याला विचारत होता की, तो सातत्याने शिवीगाळ का करत होता? त्यावेळी विराटने म्हटले की, तो त्याला रागाने का बघत होता. यावेळी गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला वाटले की, प्रकरण आणखी बिघडायला नको, म्हणून त्याने मेयर्सला विराटपासून दूर नेले आणि बोलू नको म्हटले.

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, यानंतर गंभीरने विराटला विचारणा केली की, “बोल काय म्हणत आहेस?” यावर विराट म्हणाला की, “मी तुला काही बोललो नाहीये. तुम्ही का रागाला जात आहात?” यावर गंभीर म्हणाला की, “तू माझ्या खेळाडूला बोलला आहेस, म्हणजे तू माझ्या कुटुंबाला शिवी दिली आहेस.” यावर विराट त्याला म्हणतो की, “तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांभाळून ठेवा.” यानंतर गंभीर म्हणतो की, “आता तू मला शिकवणार का?” यानंतर हे प्रकरण खूपच वाढले.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1653469520546402304

खरं तर, यापूर्वी अमित मिश्रा (Amit Mishra) याने सामन्यादरम्यान रागावलेल्या विराटला शांत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विराटने त्याच्याशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर विराट पंचांशीही रागात बोलताना दिसला. ही आयपीएल 2023मधील अशी घटना आहे, जी कुठल्याच क्रिकेटप्रेमीला लक्षात ठेवावी वाटणार नाही. विराट कोहली आणि गौतम गंभीर हे अनुभवी आणि दिग्गज खेळाडू आहेत. त्यांच्याकडून अशा वागण्याची अपेक्षा कुणालाच नव्हती. भारताच्या माजी खेळाडूंनीही यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत हे मान्य नसल्याचे म्हटले होते. (cricketer virat kohli gautam gambhir fight actual reason revealed by eyewitness)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीच्या तिसऱ्या विजयानंतर वॉर्नरचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘माहिती नाही आमच्या फलंदाजीला…’
विराट-गंभीर भांडणात यूपी पोलिसांची एन्ट्री; म्हणाले, ‘आमच्यासाठी काहीच विराट किंवा गंभीर नाही, लगेच…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---