रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली रविवारी (दि. 2 एप्रिल) आयपीएल 2023च्या पाचव्या सामन्यात चांगलाच चमकला. विराटने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध नाबाद 82 धावांची खेळी साकारत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात बेंगलोरने पाच वेळा ट्रॉफी पटकावणाऱ्या मुंबईला 8 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या सामन्यानंतर विराट कोहली तिलक वर्मा आणि नेहाल वढेरा यांच्याशी संवाद साधताना दिसला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोत विराट कोहली (Virat Kohli) तिलक वर्मा आणि नेहाल वढेरा (Tilak Varma And Nehal Wadhera) यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोत तो एक शॉट खेळण्याची पद्धत त्यांना सांगत आहे. विराटचा हा अंदाज पाहून असे वाटत आहे की, तो सांगत आहे की, आखूड खेळपट्टीवरील चेंडूवर स्वत: कसे थांबले पाहिजे. तसेच, कशाप्रकारे चेंडू सरळ मारला पाहिजे. हा तसाच शॉट वाटत आहे, जसा विराटने टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध हॅरिस रौफ याच्या चेंडूवर मारला होता.
https://twitter.com/NotASoccerF4n/status/1642607912081301504
The game's done and dusted and everyone's off the park, but Virat Kohli's still there with Tilak Varma and Nehal Wadhera, passing on some advice.#ViratKohli #TilakVarma #NehalWadhera #RCBvMI pic.twitter.com/tCgDJqPf8O
— Aadya Sharma (@Aadya_Wisden) April 2, 2023
Virat Kohli had a chat with Tilak Verma and Nehal Wadhera after the match. pic.twitter.com/93XbfQqn6V
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 2, 2023
तिलक वर्माची लाजवाब खेळी
मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्मा याने 46 चेंडूत 84 धावांची नाबाद खेळी साकारली. मुंबई संघ एकेवेळी संकटात होता. मात्र, तिलकने शेवटपर्यंत टिच्चून फलंदाजी केली. 20 वर्षीय तिलकने एका बाजून किल्ला लढवत संघाला 48 धावांवरून थेट 171 धावांचा पल्ला गाठून दिला. यावेळी तिलक आणि नेहाल वढेरा यांच्यात मुंबईसाठी सर्वात मोठी 50 धावांची भागीदारी झाली होती.
𝟖𝟒*(𝟒𝟔) – A Tilak special at Bengaluru ✨#OneFamily #RCBvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @TilakV9 pic.twitter.com/KDRcorufhR
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2023
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस (Virat Kohli And Faf Du Plessis) यांनी शानदार फलंदाजी केली. त्यांच्या खेळीच्या जोरावर बेंगलोरने मुंबईला 22 चेंडू शिल्लक ठेवून 8 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. बेंगलोरपुढे मुंबईने 172 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, विराट (49 चेंडूत नाबाद 82 धावा, 6 चौकार, 5 षटकार) आणि फाफने (43 चेंडूत 73 धावा, 5 चौकार, 6 षटकार) पहिल्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी रचली. बेंगलोरने मुंबईचे आव्हान 16.2 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात 172 धावा करून सहजरीत्या विजय मिळवला. (cricketer virat kohli giving batting tips to tilak varma and nehal wadhera of mumbai indians read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवानंतर बुमराहच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला रोहित; म्हणाला, ‘मागील 6-8 महिन्यांपासून त्याच्याशिवाय…’
चेन्नईसाठी पहिल्यांदाच चेपॉकमध्ये खेळणार नाही रैना, ‘हा’ नव्या दमाचा पठ्ठ्या पाडणार धावांचा पाऊस