आधुनिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याच्या नावाचाही समावेश होतो. विराट कोहली हा जगातील सर्वाधिक मागणी असणाऱ्या खेळाडूंमध्ये सामील आहे. ज्याप्रकारे तो मैदानात उतरतो, तेव्हा तो प्रत्येकवेळी आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. विराटच्या लोकप्रियतेमागील सर्वात मोठे कारण त्याचे व्यक्तिमत्त्वही आहे. विराट मैदानावर कधीच आपली भावना व्यक्त करण्यापासून मागे हटत नाही. विशेषत: तेव्हा, जेव्हा संघ संकटात असतो. चाहत्याला लाईव्ह सामन्यात मधले बोट दाखवण्यापासून विरोधी आणि पंचांसोबत बाचाबाचीपर्यंत विराट मैदानावर आक्रमक रूप धारण करताना दिसतो. मात्र, तो कधीही शारीरिकरीत्या कधीच भांडताना दिसला नाही. अशात 34 वर्षीय विराटने नुकताच खुलासा केला की, तो तोंडाने काहीही बोलू शकतो, पण शारीरिक भांडणात पडणार नाही.
विराट कोहली (Virat Kohli) याने स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, “शारीरिक तर चान्सच नाहीये. मला कुणी मारून निघून जाईल. मी तर मरून जाईल. त्याला नाही माहिती काय झालं.” यावेळी होस्ट जतीन सप्रू (Jatin Sapru) विराटला थांबवत म्हणाला की, “तुम्हाला पुढचा प्रश्न माहिती आहे नाही का?” यावर विराट लगेच म्हणाला की, “तोंडाने काहीही बोलवून घ्या, पण मी शारीरिक भांडण करत नाही.”
Virat bro 😭, bhai ladta hai cause he knows umpire beech mein ajayega 😂. #ViratKohli pic.twitter.com/7xM6MhpatZ
— Aani⁷ ★彡 (@wigglyywhoops) April 21, 2023
यावेळी विराटने असेही सांगितले की, तो फक्त मैदानावरच तोंडाने करायची भांडणे असतात, त्यात सामील होतो. कारण, त्याला माहिती आहे की, पंच शेवटी मध्ये येऊन दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळे करतात. त्यामुळे त्याचे वादात पडणे शक्यच नाहीये. विराट म्हणाला की, “ते पण मी मैदानात करतो. मला माहितीये की, तिथे भांडण होऊ शकत नाहीत. तिथे पंच मध्येच येतील ना.”
विराटच्या मजेशीर मुलाखतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. कारण, विराटने बेधडकपणे आपले मत मांडले आहे. खरं तर, विराट त्याच्या आक्रमक स्वभावामुळे अनेकदा अडचणीत सापडला आहे. नुकतेच आयपीएल 2023मध्ये त्याला संकटाचा सामना करावा लागला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात आक्रमक जल्लोश करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा फलंदाज विराटला सामना शुल्काच्या 10 टक्के दंड भरावा लागला होता. (cricketer virat kohli in splits talking about getting into physical fight on field see video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संजूच्या ‘रॉयल्स’ने जिंकला टॉस, RCB संघ विराटच्याच नेतृत्वाखाली देणार ‘टॉपर’ला झुंज
‘तो पंड्या नेतृत्वात स्मार्ट, पण लखनऊ…’, पराभवानंतर दिग्गजाने पुन्हा साधला राहुलवर निशाणा