भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा त्याच्या जबरदस्त फलंदाजीमुळे दिग्गज फलंदाजांच्या यादीत गणला जातो. विराटचा चाहतावर्ग कोटींच्या घरात आहे. विराटच्या याच लोकप्रियतेचा काहीजण फायदा उचलताना दिसतात. अशीच एक घटना मुंबईत घडली. विराटसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या लोकप्रियतेचा फायदा उचलत असे काही केले आहे, ज्याची दखल विराटनेही घेतली आहे. विशेष म्हणजे, विराटने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
झाले असे की, विराट कोहली (Virat Kohli) याच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीने विराटच्या लोकप्रियतेचा फायदा घेत प्यूमाकडून मुंबईच्या रस्त्यांवर प्रसिद्ध ब्रँडचे कपडे आणि बूटं विकण्यास सुरू केले. या व्यक्तीचा चेहरा विराटशी मिळता जुळता आहे. तसेच, त्याने भारतीय संघाशी मिळती जुळती जर्सीही परिधान केली होती. काही लोकांना तर तो विराटच असल्याचे वाटले आणि त्यांनी त्याच्यासोबत फोटोही घेतले.
विराटचा व्हिडिओ
विराटने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो मुंबईच्या लिंक रोडवर प्यूमा कंपनीचे बूट विकत होता. विराटने हा व्हिडिओ शेअर करत प्यूमा कंपनीकडे तक्रार केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कुणीतरी माझी नक्कल करत आहे. तसेच, मुंबईच्या लिंकिंग रोडवर प्यूमाच्या वस्तू विकत आहे. तुम्ही याकडे लक्ष आहे का?” खरं तर, हे सर्व कंपनीकडून करण्यात आलेल्या पेड प्रमोशनचा भाग आहे.
विराट यावेळी न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग नाहीये. तसेच, तो विश्रांतीसाठी मिळालेल्या वेळेचा पूर्ण आनंद लुटत आहे. विराटने त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्यासोबत उत्तराखंडचा दौराही केला होता. तिथे विराट आणि अनुष्का यांनी कुमाऊंच्या कैंची धाम येथेही गेले होते. यानंतर त्यांनी त्यांच्या चाहत्यांसोबतही फोटो काढले होते.
विराटने टी20 विश्वचषकात पाडला होता धावांचा पाऊस
विराट कोहली शेवटचा टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) दरम्यान मैदानावर दिसला होता. त्या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाला होता. मात्र, विराट बॅटमधून शानदार खेळ दाखवण्यात अपयशी ठरला होता. विराट टी20 विश्वचषक 2022मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. विराटने या स्पर्धेत एकूण 6 डावात 98.66च्या सरासरीने 296 धावा चोपल्या होत्या. या धावा करताना त्याने 4 अर्धशतकेही केली होती. (cricketer virat kohli looking like man promote puma brand team india cricketer know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बालपणीचे प्रशिक्षक म्हणतायेत, ‘शार्दुलला 2023 विश्वचषक खेळवाच”
‘त्यामुळे’ भारत विश्वचषक जिंकत नाहीये! रोहित शर्माच्या प्रशिक्षकांनी सांगितले कारण