गुरुवारचा (दि. 18 मे) दिवस रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली यांच्यासाठी खूपच खास ठरला. आयपीएल 2023च्या 65व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने होते. या सामन्यात आरसीबीने 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत प्ले-ऑफच्या आशा कायम ठेवल्या. तसेच, विराटनेही आयपीएलमधील 6वे शतक साजरे केले. सामन्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसले. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. हा क्षण चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
विराट अनुष्का व्हिडिओ कॉल
खरं तर, सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore) संघातील सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने शतक झळकावले. त्याने यादरम्यान 63 चेंडूत 100 धावा केल्या. यात 4 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता. विराटने शतक ठोकल्यानंतर अनुष्का शर्मा इंस्टाग्राम (Anushka Sharma Instagram) स्टोरी शेअर करत आधी पतीचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. यानंतर आरसीबीने हा सामना 4 चेंडू शिल्लक ठेवत जिंकताच विराट अनुष्का व्हिडिओ कॉलवर (Virat Anushka Video Call) एकमेकांना बोलताना दिसले. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकत आहेत.
एका युजरने दोघांचा फोटो ट्वीट करत लिहिले की, “तू आहेस तर मला आणखी काय हवं.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “मी मॅच पाहिली नाही, पण हे खूप स्वीट आणि क्यूट आहे.”
https://twitter.com/Imsinglevikrant/status/1659442859844702208
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1659255231228841985
विराटची आयपीएल 2023मधील कामगिरी
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत विराट कोहली याने 13 सामने खेळताना 44.83च्या सरासरीने 538 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 1 शतक आणि 6 अर्धशतकेही झळकावली आहेत. विशेष म्हणजे, हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट चौथ्या स्थानी आहे.
विराट आणि अनुष्काचे लग्न
आघाडीच्या रोमँटिक जोडप्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Kohli And Anushka Sharma) यांचे लग्न 11 डिसेंबर, 2017 रोजी इटलीत झाले होते. त्यांना 11 जानेवारी, 2021 रोजी मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी वामिका (Vamika) असे ठेवले आहे. (cricketer virat kohli made a video call to wife anushka as soon as she scored a century photo and video viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कुणीतरी विराटच्या शतकाने…’, प्रसिद्ध पत्रकाराने गंभीरवर पुन्हा साधला निशाणा, लगेच वाचा
क्लासेनने शतक झळकावत विराटलाही पाडले कौतुक करण्यास भाग, मन जिंकणारी रिऍक्शन पाहिली का?






