सध्या 2 क्रिकेट स्पर्धांचा महाकुंभमेळा येऊ घातलाय. या स्पर्धांमध्ये आशिया चषक 2023 आणि वनडे विश्वचषक 2023 यांचा समावेश आहे. आशिया चषकाला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे, तर 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक खेळला जाणार आहे. अशात चाहत्यांना आशा आहे की, भारतीय संघाने दोन्ही ट्रॉफी जिंकाव्या. मागील वेळी भारतीय संघ आशिया चषक आणि विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरला होता. अशात विराट कोहली याने ट्रॉफी जिंकण्याविषयी रोखठोक भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, खेळाडूंपेक्षा जास्त कुणालाच ट्रॉफी जिंकावी वाटत नाही.
विराटने कोहलीचे भाष्य
बंगळुरू येथील एका कार्यक्रमात विराट कोहली (Virat Kohli) याने ट्रॉफी जिंकण्याविषयी भाष्य केले. तो म्हणाला, “तुमच्यापुढे कोणतेही आव्हान असो, तुम्ही त्यासाठी उत्साही असायला पाहिजे. ज्यावेळी संकट येते, तेव्हा तुम्ही उत्साही होता. तुम्ही घाबरत नाहीत. 15 वर्षांनंतरही मला सामने आवडतात. विश्वचषक हा त्या आव्हानांपैकी एक आहे. यामुळे मी उत्साहित होतो. मला काहीतरी नवीन हवे आहे, जे वेगळ्या स्तरावर घेऊन जाईल.”
खेळाडूंपेक्षा जास्त…
पुढे बोलताना विराट सांगितले, चाहत्यांना नेहमीच वाटते की, संघाने प्रत्येक ट्रॉफी जिंकावी. मात्र, खेळाडूंपेक्षा जास्त कोणालाच ट्रॉफी जिंकावी वाटत नाही. तो म्हणाला, “दबाव असतो. चाहते नेहमी म्हणतात आम्ही (भारतीय संघाने) प्रत्येक ट्रॉफी जिंकली पाहिजे. मी म्हणेल की, माझ्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे मी योग्य जागी आहे. प्रामाणिकपणे सांगतो, मला माहितीये की, आशा असते आणि लोकांच्या भावना असतात. मात्र, कृपया हे लक्षात घ्या की, खेळाडूंपेक्षा जास्त ट्रॉफी जिंकण्याची इच्छा कोणालाही नाहीये.”
भारतीय संघ शिबिरात
सध्या भारतीय संघ आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी बंगळुरू येथील अलूर शिबिरात आहे. आशिया चषकातील सर्व सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळले जातील. भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. हा पाकिस्तानचा स्पर्धेतील दुसरा सामना असेल. स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तान आणि नेपाळसोबत अ गटात आहे. तसेच, ब गटातील संघांमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि गतविजेत्या श्रीलंका यांचा समावेश आहे. (cricketer virat kohli said more than players no one wants to win trophy asia cup 2023 world cup 2023)
हेही वाचलंच पाहिजे-
हे काय केलंस! ‘दादा’ने एशिया कपसाठी निवडली भारताची सर्वोत्तम Playing 11, पण फॉर्ममधील खेळाडू संघातून बाहेर
Asia Cup 2023: बलाढ्य संघांविरुद्ध भिडण्यासाठी नेपाळची धुरा 20 वर्षांच्या कर्णधारावर, वाचा कोण आहे तो