ऑस्ट्रेलिया संघाने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारतीय संघाला 209 धावांनी लाजीरवाण्या पराभवाचा सामना करण्यास भाग पाडले. भारताकडे 10 वर्षांनंतर आयसीसी चषक जिंकण्याची सुवर्णसंधी होती, पण हा दुष्काळ संपवण्यात भारत अपयशी ठरला. या पराभवानंतर भारतीय संघावर टीकास्त्र डागण्यात येत आहे. चाहते अंतिम सामन्यात चांगलं प्रदर्शन न करणाऱ्या कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंवर खूपच नाराज आहेत. अशात सोमवारी (दि. 19 जून) विराटने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विराटला ट्रोल केले.
विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन व्हिडिओ आणि एक फोटो शेअर केला. ही पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “निमित्त शोधा किंवा चांगले बनण्यासाठी प्रयत्न करा.” विराटच्या या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. अनेक चाहते एकीकडे विराटच्या फिटनेस आणि आवडीविषयी त्याचे कौतुक करत आहेत. दुसरीकडे, अनेकांनी त्याच्यावर टीकास्त्र डागले.
Look for excuses or look to get better. pic.twitter.com/qbTmcNlGfR
— Virat Kohli (@imVkohli) June 19, 2023
एकाने कमेंट करत लिहिले की, “एक आयसीसी ट्रॉफी जिंकू शकत नाहीस, अशा व्यायामाचा काय फायदा?”, दुसऱ्या एकाने लिहिले की, “जिम केल्याने सहाव्या स्टम्प लाईनची समस्या ठीक होत नाहीये.” आणखी एकाने लिहिले की, “शॉट ऑफ साईडला जाणाऱ्या चेंडूवरच मारायचा असेल, तर काय फायदा.” खरं तर, विराटने ऑफ साईडला जाणाऱ्या बाहेरच्या चेंडू मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली होती.
Kya fayeda itni kasrat ka jab ek ICC trophy nhi jeet paate?
— Sudhanshu (@HUmaiBOT) June 19, 2023
Gym karne se 6th stump line problem is not getting better
— Clairvoyant (@Anachronist26) June 19, 2023
Kya fayda jab maarni off side off stump wali ball hee hai ????????
— Butterchickenstarboy (@BlackCheeseus14) June 19, 2023
विराटची डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील कामगिरी
विराट कोहली याने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात (WTC Final) एकूण 63 धावा केल्या. त्याने पहिल्या डावात 14 धावा करत मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. स्टार्कच्या भेदक उसळीचे उत्तर विराटकडे नव्हते. यानंतर दुसऱ्या डावात विराटने 49 धावांची खेळी साकारली. यानंतर तो स्कॉट बोलँड याच्या गोलंंदाजीवर बाद झाला. बोलँडने विराटचा कमकुवत भाग ओळखून गोलंदाजी केली. यावेळी विराटने स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथ याला झेल दिला आणि तंबूचा रस्ता पकडला.
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यानंतर भारत वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय चाहत्यांना विराटकडून आशा असतील. 12 जुलैपासून सुरू होत असलेल्या या दौऱ्यात भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या 22 वर्षीय युवा खेळाडूला पंतच्या बॅटिंग स्टाईलची भुरळ; म्हणाला, ‘मलाही रिषभसारखं…’
ICC Rules : वनडे अन् टी20मधील पॉवरप्ले, कधी झाले बदल आणि काय होता बॅटिंग Powerplay नियम? वाचा