भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेतेपदासाठी अंतिम सामन्यात काट्याची टक्कर सुरू आहे. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित केला. अशाप्रकारे, भारताला विजयासाठी 444 धावांचे भले मोठे आव्हान मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक 66 धावा ऍलेक्स कॅरे याने केल्या. तसेच, भारताकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 3 विकेट्स, तर उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मात्र, याच दिवशी भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली आणि शुबमन गिल यांचा लक्षवेधी व्हिडिओ व्हायरल होत आहे.
चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव लवकर संपवण्याच्या इराद्याने उतरले होते. मात्र, त्यांनी धीराने फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडले. यादरम्यान विराट कोहली (Virat Kohli) याने शुबमन गिल (Shubman Gill) याच्यासोबत असे काही कृत्य केले, जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
Virat Kohli teasing Gill???????? pic.twitter.com/N9lrLEOg7W
— SAFIKUL ISLAM???????? (@iselfsafikul) June 10, 2023
झालं असं की, विराट कोहली आणि शुबमन गिल ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावादरम्यान स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत होते. दोघेही यावेळी मस्तीच्या मूडमध्ये होते. मात्र, विराटने गिलसोबत असे काही कृत्य केले, जे कॅमेऱ्यात कैद झाले.
Virat Kohli teasing Shubman Gill. pic.twitter.com/ygdFsiO98Q
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 10, 2023
व्हायरल फोटोवर एकाने कमेंट करत लिहिले की, “लाज वाटते विराट तुझी.”
Shame on Virat saab????????????????
— Bakri Player (@cric_nerd2) June 10, 2023
दुसऱ्या एकाने लिहिले की, “विराटवर चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी बंदी घातली पाहिजे.”
Kohli should be banned for ball tempering.
— PV (@JustStopIt_PV) June 10, 2023
खरं तर, आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात विराट कोहली आणि शुबमन गिल (Virat Kohli And Shubman Gill) यांनी शानदार प्रदर्शन केले. मात्र, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात त्यांना हा फॉर्म कायम ठेवता आला नाही. विराटने पहिल्या डावात 14 धावा केल्या, तर शुबमन फक्त 13 धावांवर तंबूत परतला. वरची फळी ढासळल्याने भारताला पहिल्या डावात 469 धावांचा पाठलाग करताना फक्त 296 धावाच करता आल्या.
यावेळी शुबमन गिल पहिल्या डावात पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यानंतर 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गिल स्कॉट बोलँड याच्या 8व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कॅमरून ग्रीन याच्या हातून झेलबाद झाला. यावेळी बोलँडने गिलला दुसऱ्यांदा आपला शिकार बनवले. पहिल्या डावातही बोलँडने गिलला त्रिफळाचीत करत तंबूत पाठवले होते.
महत्वाच्या बातम्या-
निर्णायक स्थितीत थर्ड अंपायरचा वादग्रस्त निर्णय! गिलला आऊट देताच 140 कोटी भारतीय म्हणाले, ‘चुकीचा निर्णय’
कांगारूंच्या दुसऱ्या डावात स्मिथ अन् हेडवरही भारी पडला कॅरे, नाबाद राहत केली ‘ही’ खास कामगिरी