विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात आयपीएल 2023च्या 43व्या सामन्यादरम्यान वाद झाला होता. या वादानंतर दोघांवरही सामना शुल्काच्या 100 टक्के दंड आकारण्यात आला होता. विराट आणि गंभीर लखनऊ येथील सामन्यादरम्यान भिडले होते. मात्र, एका वृत्तानुसार आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली दंड भरणार नाहीये. विराटचा दंड आरसीबी संघ भरणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, विराट कोहली याच्या पगारात कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही. विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli And Gautam Gambhir) यांच्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) सामन्यादरम्यान वाद झाला होता. त्यावेळचा हा मुद्दा अजूनही चर्चेत आहे.
‘विराटच्या पगारात कपात होणार नाही’
सोमवारी (दि. 1 मे) लखनऊ सुपर जायंट्स संघाला बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात 18 धावांनी पराभवाच सामना करावा लागला होता. या सामन्यादरम्यान विराट आणि गंभीर यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर दंड आकारण्यात आला होता. एका वृत्तानुसार, आरसीबीच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “विराटचा दंड फ्रँचायझी भरेल. खेळाडू जे काही करतात, ते संघासाठीच करतात आणि याचा आम्ही सन्मान करतो. त्यामुळे आम्ही त्यांच्या पगारात कोणत्याही प्रकारची कपात करणार नाही.”
विराटचा आयपीएल 2023चा पगार 15 कोटी
विराट कोहली (Virat Kohli) याला वर्षाकाठी 15 कोटी रुपये पगार मिळतो. जर त्याने दंड भरला, तर त्याला जवळपास 1.07 कोटी रुपये द्यावे लागतात. विराटला प्रत्येक सामन्यासाठी 1 कोटींहून अधिक रुपये मिळतात. त्याला एकूण 14 सामने खेळायचे आहेत. त्या हिशोबाने त्याला प्रत्येक सामन्यासाठी एक कोटींहून अधिक रुपये मिळतात. माध्यमांतील वृत्तांनुसार, विराटचा दंड बेंगलोर भरणार आहे. सामान्यत: असेच होते. मात्र, विराटला आता कोणताही दंड भरावा लागणार नाही. दुसरीकडे, गौतम गंभीर याच्या पगार कपातीबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाहीये. गंभीरसोबतच नवीन उल हक यालाही दंड ठोठावला होता. नवीनला 50 टक्के दंड भरण्यास सांगितला होता. (cricketer virat kohli will not pay fine royal challengers bangalore on field spat with gautam gambhir ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आतल्या गोटातील बातमी! अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार भारत-पाकिस्तानचा आमना-सामना? वाचा
धोनीच्या आयपीएल खेळण्याबाबत माजी खेळाडूची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आता तो फक्त एक…’