सेंचुरीयन | सोशल मीडियावर सध्या भारतीय संघा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुषका शर्माचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. एक प्रेमी आणि प्रेमिका एकमेकांना घट्ट अलिंगनाचा देत असल्याच्या फोटोसमोर हा फोटो त्यांनी काढला आहे.
विराट कोहलीनं शेअर केलेल्या या फोटोला एका तासात १३ लाख लाईक्स भेटलेत. तर २५ हजार लोकांनी या फोटोवर कमेंट केलीय. सोशल मीडियावर जिकडे तिकडे हाच फोटो पहायला मिळतो.
विराट आणि अनुष्का ११ डिसेंबर रोजी विवाह झाला असुन दौरा सुरू झाला तेव्हा अनुष्का विराटसह आफ्रिकेला रवाना झाली होती. त्यानंतर अाज १ महिन्यानंतर ती पुन्हा आफ्रिकेला गेल्याचं बोललं जातं आहे.
https://www.instagram.com/p/BfaVLXNAXeq/?utm_source=ig_embed
विराट सद्धया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तो संपूर्ण मालिकेत जबरदस्त फाॅर्ममध्ये आहे. त्याने या दौऱ्यात १० सामन्यात ८७० धावा केल्या आहेत. त्याला या दौऱ्यात १००० धावा करायला केवळ १३० धावांची गरज आहे.