भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक करण्यात आली होती. पण नंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्याची अटकपूर्व जामीनाच्या अधारावर सुटका करण्यात आली. त्याच्यावर अनुसुचीत जातींविरुद्ध अपमानजनक टिपण्णी करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार असे समजत आहे की युवराजला हांसी पोलिसांकडून (हिसार, हरियाणा) अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध राष्ट्रीय आघाडी आणि दलित मानवाधिकारांचे संयोजक वकील रजत कलसन यांनी हांसी पोलिस स्टेशनमध्ये एससी एसटी कायद्याअंतर्गत एफआयआर नोंदवला होता.
त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याची चौकशीनंतर जामीनावर सुटका करण्यात आली. त्याला काहीदिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळालेली. युवराज सुटकेनंतर पुन्हा चंदीगढ़ला रवाना झाल्याचे समजत आहे.
नक्की काय आहे प्रकरण
मागील वर्षी युवराजने भारताचा सलामीवीर रोहित शर्मासह लाईव्ह व्हिडिओ चॅट केले होता. त्यावेळी त्याने संभाषण करताना युजवेंद्र चहलवर एक जातीवाचक टिप्पणी केली होती. ज्यानंतर त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामुळे युवराजवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तसेच त्याने माफी मागावी म्हणून मागण्या होत होत्या. त्यानंतर युवराजने ट्विट करत त्याचा कोणालाही दुखावण्याचा हेतु नसल्याचे स्पष्ट करत माफी मागितली होती.
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1268810700429897728?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1268810700429897728%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2Fyuvraj-singh-dalit-comment-on-yuzvendra-chahal-case-will-be-investigated-by-chandigarh-police%2F
पण असे असले तरी हा वाद तेव्हा वाढला, जेव्हा रजत कालसन यांनी युवराज सिंगविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्यावेळी त्यांनी युवराज सिंगला अटक करण्याची मागणी केली होती. त्यांनी हे प्रकरण लावून धरले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
वुमेन्स बीबीएलमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला!! राधा अन् शेफालीच्या कामगिरीने सिडनी सिक्सरचा विजय
विराट म्हणतो, ‘२००७ टी२० विश्वचषकाने कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला, एक तरुण खेळाडू म्हणून मला…’
विराटला भेटण्यापूर्वी अनुष्का क्वारंटाईन; समोर असूनही एकमेकांना भेटणे झाले कठीण, पाहा फोटो