---Advertisement---

चहल दारुच्या नशेत? नीट चालताही येत नसल्याने घेतला व्यक्तीचा आधार, व्हिडिओ तुफान व्हायरल

On: रविवार, एप्रिल 30, 2023 2:35 PM
Yuzvendra-Chahal
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत आपला जलवा दाखवताना दिसत आहे. आयपीएल 2023मध्ये चहल राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. चहल हा स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील आहे. दुसरीकडे, चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर चहलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे की, चहल दारुच्या नशेत आहे.

चहलला सरळ चालता का येत नाहीय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, युझवेंद्र चहल त्याच्या कारकडे जात आहे. मात्र, यामध्ये दिसते की, त्याला चालताना अडचण येत आहे. म्हणजेच तो सरळ चालत नाहीये. तसेच, एक व्यक्ती त्याला आधार देत कारपर्यंत पोहोचवत आहे. त्याच्यासोबत असणारा व्यक्ती चहलला कारमध्ये बसवतो. मात्र, व्हिडिओत स्पष्ट दिसते की, चहल कारमध्ये बसल्यानंतरही अस्वस्थ आहे. चहल ज्या गाडीत बसत आहे, त्यामध्ये मुंबई इंडियन्सचा लोगो लावला होता.

https://twitter.com/byomkesbakshy/status/1652189490839179264?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1652189490839179264%7Ctwgr%5E1376f9430879d763249c4da8781c51029ddbfcec%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Fyuzvendra-chahal-trolled-after-his-drunk-look-viral-on-social-media-1086742

रोहित शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीत सामील होता चहल?
या व्हिडिओत असा दावा केला जात आहे की, चहल मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेला होता. तसेच, हा व्हिडिओ तिथून बाहेर पडतानाचा आहे. मात्र, याबाबत कोणतीही पुष्टी झाली नाहीये की, हा व्हिडिओ रोहितच्या पार्टीतील आहे की नाही. दुसरीकडे, चहल अशाप्रकारे का चालत होता, याचीही पुष्टी झाली नाहीये. तो नशेत होता की, त्याला इतर कोणती समस्या होती, याची पुष्टी अद्याप झाली नाहीये. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://twitter.com/HasnaZarooriHai/status/1652258191063875587?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1652258191063875587%7Ctwgr%5Edeb944692718b2df8dbf78c52fee7814bee87f3f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fipl%2Fipl-2023-rajasthan-royals-spinner-yuzvendra-chahal-viral-video-watch-here-2396266

https://twitter.com/ChoudharyRj9750/status/1652270461361983490?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1652270461361983490%7Ctwgr%5Edeb944692718b2df8dbf78c52fee7814bee87f3f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fipl%2Fipl-2023-rajasthan-royals-spinner-yuzvendra-chahal-viral-video-watch-here-2396266

https://twitter.com/GopalSkush/status/1652338606873387014?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1652338606873387014%7Ctwgr%5Edeb944692718b2df8dbf78c52fee7814bee87f3f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fipl%2Fipl-2023-rajasthan-royals-spinner-yuzvendra-chahal-viral-video-watch-here-2396266

मुंबईविरुद्ध पुढील सामना खेळणार राजस्थान
राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना रविवारी (दि. 30 एप्रिल) मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडिअम येथे सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. राजस्थान संघाने आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवला असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी कायम आहेत. (cricketer yuzvendra chahal trolled after his drunk look viral on social media)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान सुधरणार नाही! लाईव्ह सामन्यात घडली मोठी चूक, अंपायर्सनी लगेच थांबवली मॅच; पाहा व्हिडिओ
मोहम्मद शमीने मोडलं KKRचं कंबरडं, IPL 2023मध्ये केली अनोखी ‘शंभरी’, सिराजनंतर बनला दुसराच गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---