प्रेम ही अशी भावना आहे, जिला नाव वयाचं बंधन नसतं, हा भाषेच ना प्रांताच. अतिसामान्य माणूस असो किंवा मोठ्यात मोठा सेलिब्रिटी कोणालाही कोणावरही प्रेम होऊ शकते. अगदी आपले आवडते क्रिकेटर्सही प्रेमात पडूनच अनेकदा आपला संसार थाटताना दिसतात. भारतीय क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्री यांची प्रेम प्रकरणे नेहमीच समोर येत असतात. त्यातील कित्येकांनी तर या अभिनेत्रींना आपला जोडीदार म्हणून निवडले. त्याचवेळी असे काही क्रिकेटर्स आहेत ज्यांना, खेळाडू असलेल्या मुलींचा सौंदर्याची आणि त्यांच्या खेळाची भुरळ पडली. त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. आणि शेवटी त्यांनी सात जन्मासाठी एकत्र होण्याचा निर्णय घेतला. आजच्या या लेखात आपण अशाच क्रिकेटर्सची माहिती करून घेणार आहोत, ज्यांनी महिला खेळाडूंशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये 1 जून रोजी 38वा वाढदिवस साजरा करणाऱ्या दिनेश कार्तिक याच्या नावाचाही समावेश आहे.
मिचेल स्टार्क- एलिसा हिली
पती-पत्नी दोघेही क्रिकेटर आहेत अशी उदाहरणे क्रिकेटविश्वात अगदी बोटावर मोजण्याइतपत असतील. मात्र, त्यातही सर्वात चर्चित जोडी असते ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि त्याची पत्नी एलिसा हिली यांची. दोघेही आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियाच्या प्रतिनिधित्व करतात. स्टार्क याला अनेकदा आपल्या पत्नीला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये पाहिले जाते. ऑस्ट्रेलियन महिला संघाची उपकर्णधार असलेली एलिसा यष्टीरक्षक सलामीवीर आहे. 2020 टी20 वर्ल्डकप फायनल व 2022 वनडे वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी स्टार्क स्वतः उपस्थित होता. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यात एलिसाने शानदार कामगिरी केली होती.
https://www.instagram.com/p/CbeHafqvwH0/
सानिया मिर्झा- शोएब मलिक
पती-पत्नी दोघांचेही आपल्या खेळात एक अविस्मरणीय करियर राहिले आहे, अशी जोडी म्हणजे भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक. भारतीय टेनिस इतिहासातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून सानिया मिर्झाचा उल्लेख होतो, तर शोएब मलिक हा पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार राहिला आहे. या दोघांनी २०१०मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नानंतरही दोघांनी आपले करिअर पुढे चालू ठेवले आहे. शोएब टी२० स्पेशालिस्ट म्हणून वयाच्या चाळिशीत देखील लाजवाब खेळ दाखवतोय, तर मातृत्वाच्या जबाबदारीनंतर सानियाने देखील २०२१ मध्ये टेनिस कोर्टवर कमबॅक केला होता. विशेष म्हणजे लग्नानंतरही सानिया भारतासाठीच आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनीस खेळते.
हेही वाचा- भारतीय क्रिकेटर्सच्या जीव की प्राण असलेल्या त्यांच्या पत्नी
दिनेश कार्तिक- दीपिका पल्लीकल
पती क्रिकेटर आणि पत्नीदेखील खेळाडू या यादीतील सर्वात प्रेरणादायी जोडी कोणती असेल, तर ती म्हणजे भारताचा वरिष्ठ क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि आंतरराष्ट्रीय स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल यांची. 1 जून, 1985 रोजी जन्मलेल्या दिनेश कार्तिक याने पहिले लग्न 2007मध्ये निकिता या आपल्या मैत्रिणीशी केले होते. मात्र, नंतर निकिताने दिनेशला धोका देत त्याचाच मित्र आणि भारतीय क्रिकेटर मुरली विजय याच्याशी लग्नगाठ बांधली. या प्रकरणानंतर दिनेश पुरता हादरला होता. अशात एका जिममध्ये दिनेश आणि दीपिका यांची ओळख झाली. दिनेशच्या आयुष्यात घडलेल्या त्या वाईट प्रसंगातून बाहेर येण्यासाठी दीपिकाने मदत केली. पुढे चौघांनी 2016 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर दिनेशच्या करियरने वेग पकडला. तसेच दीपिकादेखील नियमितपणे स्क्वॅशमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आली आहे.
https://www.instagram.com/p/CdDgHw0IyF-/
ईशांत शर्मा- प्रतिमा सिंग
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेली आणखी एक खेळाडू कपल जोडी म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि त्याची पत्नी प्रतिमा सिंह. प्रतिमा ही भारताची इंटरनॅशनल बास्केटबॉल प्लेअर राहिली आहे. भारतासाठी 100 पेक्षा जास्त कसोटी खेळलेला ईशांत व 2010 एशियन गेम्समध्ये भारताच्या बास्केटबॉल टीमची व्हाईस कॅप्टन असलेली प्रतिमा, यांनी 2016 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतलेला. विशेष म्हणजे प्रतिमा हीच्या चार बहिणीदेखील भारतासाठी बास्केटबॉल खेळल्या आहेत. एका बास्केटबॉल इव्हेंट दरम्यानच ईशांत व प्रतिमा यांची ओळख झाली होती.
https://www.instagram.com/p/CZoirxTPMfW/
रॉबिन उथप्पा- शितल गौतम
आणखी एक असा भारतीय क्रिकेटर आहे, ज्याच्या पत्नीने भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनीस खेळले आहे. तो खेळाडू आहे भारताचा अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पा. होय, रॉबिन उथप्पा याची पत्नी शितल गौतम ही तब्बल दहा वर्षे भारतासाठी टेनिस खेळली आहे. 2001 ते 2011 यादरम्यान तिने आपले करियर केले. मात्र, नंतर दुखापतीमुळे ती आपले करिअर जास्त लांब नेऊ शकली नाही. तिच्या नावे पाच आयटीएफ विजेतेपदे आहेत. 2016 मध्ये तिने रॉबिन उथप्पाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रॉबिन व शितल यांना नील नोलन नावाचा एक मुलगा देखील आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 11 कर्णधारांच्या नेतृत्वात दिनेश कार्तिक खेळलाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट, एका पाकिस्तानी नावाचाही समावेश; लगेच वाचा
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 17: धोनी आधी पदार्पण करुनही 14 वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक