भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत विराट कोहलीने एक खास विक्रम केला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 312 झेल घेण्याचा विक्रम केला आहे. याबरोबर जगातील सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत तो ६व्या स्थानावर आला आहे.
विकेटकिपर नसलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनेच्या नावावर आहे. त्याने 652 सामन्यात 440 झेल घेतले आहेत. यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने 560 सामन्यात 364 झेल घेतले आहेत. तर तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा रॉस टेलर आहे. त्याने 450 सामन्यात चक्क 351 झेल घेतले आहे. आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने 519 सामन्यात 338 झेल घेतले आहे तर या यादीत भारतीय संघाचा सध्याचा कोच असलेल्या द्रविडचा पाचव्या स्थानावर नंबर लागतो. द्रविडने क्रिकेट कारकिर्दीत 436 सामन्यात 335 झेल घेतले आहे.
मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर डिन एल्गारचा झेल घेत विराटने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 312 झेल घेण्याचा पराक्रम केला आहे. विराटचा हा 520वा सामना होता. सर्वाधिक झेल घेणाऱ्या भारतीय क्षेत्ररक्षकांमध्ये विराट आता कोच राहुल द्रविडनंतर दुसऱ्या स्थानावर आला आहे. भारताकडून तिसऱ्या स्थानावर माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन असून त्याने 433 सामन्यात 261 झेल घेतले आहे.
विराट कोहलीच्या 312 आंतरराष्ट्रीय झेलांपैकी वनडेमध्ये 292 सामन्यात 151 झेल, टी20मध्ये 115 सामन्यात 50 तर कसोटीत 113 सामन्यात 111 झेल घेतले आहे. (Cricketers in the world who specialize in taking catches, this cricketer is ahead of even Virat)
महत्वाच्या बातम्या –
केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी भारताने मारली बाजी, मालिकेत बरोबरी करत कर्णधारच्या नावावर मोठा विक्रम
रणजी ट्रॉफी स्पर्धेचा इतिहास, आजपर्यंतचे विजेते आणि मुंबई-महाराष्ट्र-विदर्भ संघाची कामगिरी