आयपीएलचा १४ वा हंगाम येत्या ९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. गतवर्षी कोरोना असल्यामुळे ही स्पर्धा उशिराने युएईमध्ये रंगली होती. परंतु १४ वा हंगाम भारतातच रंगणार आहे. या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला होता, ज्यामध्ये अनेक खेळाडूंवर कोटींची बोली लावण्यात आली होती. तर असेही काही भारतीय दिग्गज खेळाडू होते, ज्यांना कोणीही खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
त्याच खेळाडूंचा आम्ही येथे आढावा घेतला आहे. चला तर पाहूया कोण आहेत ते भारतीय खेळाडू…
१) युसुफ पठाण : भारतीय संघाचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाण याने भारतीय संघासाठी अनेक महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत. आयपीएल २०२१ मध्ये झालेल्या लिलावात त्याची मूळ किंमत १ कोटी इतकी होती. परंतु त्याला कुठल्याही संघाने आपल्या संघात स्थान दिले नाही. त्यानंतर त्याने २६ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १७४ सामने खेळले होते. यात त्याने २९.१ च्या सरासरीने ३२०४ धावा केल्या होत्या. यात त्याने ४२ गडी देखील बाद केले होते.
२) विनय कुमार : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज विनय कुमारने देखील २६ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला टाटा बाय बाय केले होते. त्याने देखील आयपीएल २०२१ साठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात सहभाग घेतला होता. त्याची मुळ किंमत देखील १ कोटी रुपये इतकी होती. परंतु विनय कुमारला देखील कुठल्याही संघाने आपल्या संघात स्थान दिले नाही. हा लिलाव झाल्यानंतर विजय कुमारने निवृत्ती जाहीर केली होती. विजय कुमारने आयपीएल कारकिर्दीत एकूण १०५ सामने खेळले आहेत. यात त्याने ३१० धावा केल्या होत्या. यासोबतच त्याने गोलंदाजी करताना १०५ गडी बाद केले होते.
३) नमन ओझा : नमन ओझा ने आयपीएल लिलावाच्या ३ दिवसापूर्वीच म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने देखील आयपीएलच्या लिलावात आपला सहभाग नोंदवला होता. त्याने आपली मूळ किंमत ५० लाख इतकी ठेवली होती. परंतु त्याला कुठलाही खरिदादर मिळाला नाही. नमन ओझाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकूण १२३ सामने खेळले होते. यात त्याने २०.७ च्या सरासरीने १५५४ इतक्या धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
झोपेच्या गोळ्या खाऊन ‘या’ क्रिकेटपटूने खेळला होता विश्वचषक सामना, पुढे काय झालं एकदा पाहाच
दस्तुरखुद्द आनंद महिंद्रा यांच महागडं गिफ्ट वॉशिंग्टनच्या दारात उभं, सुंदरने ‘असे’ मानले आभार
टीका केली, तरीही गुरु तो गुरुच! पृथ्वी शॉने प्रशिक्षक पाँटिंगची केली ‘चक दे’मधील शाहरुख खानशी तुलना