पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक रमीज राजा यांनी मॅच फिक्सिंग प्रकरणात समावेश असणाऱ्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी सल्ला दिला की, या क्रिकेटपटूंना किराणा मालाचे दुकान टाकले पाहिजे.
स्पॉट फिक्सिंग (Spot Fixing) प्रकरणी खेळण्यास बंदी आणि अनेक वर्ष तुरुंगवास लाभलेल्या मोहम्मद आमिरला पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात स्थान दिल्यामुळे राजा (Ramiz Raja) यांनी टीका (Critics) केली आहे.
राजा यावेळी म्हणाले की, “जर तुम्ही मला विचाराल तर मी सल्ला देईल की, अशा क्रिकेटपटूंनी थेट किराणा मालाची दुकाने खोलली पाहिजेत.” Start Grocery Shops
फिक्सिंगसारखी कामे करणाऱ्या क्रिकेटपटूंबद्दल बोलताना राजा यांनी सांगितले की, यामुळे पाकिस्तान क्रिकेटचे खूप नुकसान झाले आहे. त्यांनी आमिरच्या (Mohammad Amir) नावाचा उल्लेख करत पुढे म्हटले की, “दिग्गज क्रिकेटपटूंना सूट दिल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचे खूप नुकसान झाले आहे, यात मला तिळमात्र शंका नाही.”
त्याचबरोबर राजा यांनी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमची प्रशंसा करत म्हटले की, “जर, चांगली संधी मिळाली तर आझम (Babar Azam) नक्कीच भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) पुढे जाईल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-टी२० विश्वचषक झाला नाही तर जगातील ५ क्रिकेटपटूंचं करियर जवळपास संपल्यात जमा
-२५ वर्षांपेक्षा जास्त काळ कसोटी खेळणारे ५ दिग्गज खेळाडू
-गौतम गंभीर म्हणतो, धोनी नकोच; या खेळाडूला द्या टी२० विश्वचषकात संधी