2024 हे वर्ष क्रिकेट जगतासाठी अत्यंत महत्त्वाचे होतं. या वर्षी अनेक खेळाडूंनी मैदानावर बॅटनं आपलं कौशल्य दाखवलं. तर दुसरीकडे काही खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक घडामोडी घडल्या. काही खेळाडूंचं लग्न झालं, तर काहींना पिता होण्याचं भाग्य लाभलं. या बातमीत आम्ही तुम्हाला अशाच काही खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांना यावर्षी पिता होण्याचा बहुमान मिळाला.
(1) विराट कोहली – या यादीत पहिलं नाव आहे भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचं. खरंतर, कोहली 2021 सालीच पहिल्यांदा बाप बनला होता. यावर्षी त्याच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला. मार्चमध्ये विराटची पत्नी अनुष्कानं मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव ‘अकाय’ ठेवण्यात आलंय. यापूर्वी 2021 मध्ये त्यांना वामिका नावाची मुलगी झाली होती.
(2) रोहित शर्मा – भारताचा कर्णधार रोहित शर्माही यावर्षी दुसऱ्यांदा बाप बनला. यापूर्वी 2018 मध्ये त्याला मुलगी झाली होती. आता त्याला नोव्हेंबरमध्ये मुलगा झाला आहे.
(3) केन विल्यमसन – न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन यावर्षी तिसऱ्यांदा पिता बनला आहे. त्याची जोडीदार सारा रहीम हिनं 28 फेब्रुवारीला दुसऱ्या मुलीला जन्म दिला.
(4) ट्रॅव्हिस हेड – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ट्रॅव्हिस हेडची पत्नी जेसिका डेव्हिसने यावर्षी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा आला. हेड सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियासाठी शानदार कामगिरी करत आहे.
(5) अक्षर पटेल – भारताचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेलच्या घरी यावर्षी प्रथमच छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. तो नुकताच 19 डिसेंबरला पिता बनला. अक्षर 2024 टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य होता.
हेही वाचा –
मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन घोषित, घातक खेळाडूचं पदार्पण
सिराजला डच्चू! दोन फिरकीपटूंसह उतरणार टीम इंडिया? बॉक्सिंग डे कसोटीत अशी असेल भारताची प्लेइंग 11
भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांना 7 वर्षाच्या तुरुंगाची शिक्षा, काय आहे प्रकरण?