मंगळवारी (२३ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान पहिला वनडे सामना महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या गहुंजे पुणे येथे झाला. या सामन्यात भारताकडून अष्टपैलू हार्दिक पंड्या व वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांनी पदार्पण केले. कृणालचे हे वनडे पदार्पण होते, तर प्रसिद्धचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण ठरले.
भारताकडून वनडे पदार्पण करणारा कृणाल पंड्या २३३वा तर प्रसिद्ध क्रिष्णा २३४वा खेळाडू ठरला. पुण्यात वनडे पदार्पण करणारे प्रसिद्ध कृष्णा व कृणाल पंड्या हे दोघेच भारतीय खेळाडू ठरले आहेत. यापुर्वी फॅबियन ऍलेन या वेस्ट इंडिजच्या खेळाडूने भारताविरुद्ध येथे वनडे पदार्पण केले होते.
गहुंजेच्या या स्टेडियमवर आजपर्यंत ५ खेळाडूंनी टी२०, ३ खेळाडूंनी वनडे व एका खेळाडूने कसोटी पदार्पण केले आहे. पुण्यात एमसीए स्टेडियमवर सामने होण्यापुर्वी नेहरु स्टेडियम, स्वारगेट येथे आंतरराष्ट्रीय सामने होत असे. नेहरु स्टेडियमवर ८ खेळाडूंनी आंतराष्ट्रीय पदार्पण केले होते. आता हाच विक्रम पुण्याच्याच एमसीए स्टेडियमवर मोडला गेला आहे. १९८४ साली पहिला सामना झालेल्या नेहरु स्टेडियमवर शेवटचा सामना २००५ साली झाला. त्यानंतर २०११ सालापासून पुण्यातील आंतरराष्ट्रीय सामने एमसीए स्टेडियम गहुंजे येथे होत आहेत.
पुण्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारे खेळाडू-
जेम्स ट्रे़डवेल- २०१२, टी२० पदार्पण, विरुद्ध भारत
स्टुअर्ट मेकर- २०१२, टी२० पदार्पण विरुद्ध भारत
परविंदर अवाना- २०१२, टी२० पदार्पण विरुद्ध इंग्लंड
निरोशन डिकवेल्ला- २०१६, टी२० पदार्पण, विरुद्ध भारत
कसुन रजिथा- २०१६, टी२० पदार्पण, विरुद्ध भारत
फॅबियन ऍलेन- २०१८, वनडे पदार्पण, विरुद्ध भारत
ऍन्रिच नॉर्त्झे- २०१९, कसोटी पदार्पण, विरुद्ध भारत
कृणाल पंड्या- २०२१, वनडे पदार्पण, विरुद्ध इंग्लंड
प्रसिद्ध क्रिष्णा- २०२१, वनडे पदार्पण, विरुद्ध इंग्लंड
महत्त्वाच्या बातम्या-
संघासाठी काहीही करण्यासाठी तयार असलेले ‘हे’ तीन खेळाडू वनडे मालिकेत होऊ शकतात मालिकावीर
तब्बल ६१८ दिवसांनंतर एकहाती सामना जिंकून देणारा ‘हा’ खेळाडू करतोय वनडे कमबॅक, भारताला भरवणार धडकी!