इंग्लंड क्रिकेट टीम जेव्हा-जेव्हा वर्ल्डकपसारख्या टूर्नामेंटमध्ये सहभागी होते तेव्हा-तेव्हा एक चर्चा नक्की होते की, यांच्या टीममध्ये प्रॉपर इंग्लिश प्लेयर किती आहेत?. कारण दर वेळीच इंग्लंडच्या संघामध्ये विविध देशांमध्ये जन्मलेले क्रिकेटर खेळताना दिसून येतात. इतकंच काय २०१९ वर्ल्ड कप जिंकणार्या टीमचा कॅप्टन ओएन मॉर्गन दुसऱ्या देशात जन्मलेला, आणि त्या देशासाठी खेळलेला होता. क्रिकेटजगतात असे अनेक क्रिकेटर आहेत जे दोन देशांसाठी खेळलेत. आज आपण अशा क्रिकेटर्सविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी अंडर नाईन्टीन वर्ल्डकप एका देशासाठी खेळल्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेट दुसऱ्या देशासाठी खेळायचा निर्णय घेतला. चला तर या व्हिडिओला सुरुवात करुया…
इम्रान ताहिर
विकेट मिळवल्यानंतर अतिशय जोशात धावून आपले ट्रेडमार्क सेलिब्रेशन करणारा दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर या यादीत पहिल्या नंबरवर. ताहिरने आपले इंटरनॅशनल करिअरच ३१ व्या वर्षी सुरु केले. ताहिर नऊ-दहा वर्षे इंटरनॅशनल क्रिकेट खेळला आणि दक्षिण आफ्रिकेचा लिजेंड स्पिनर ठरला. मात्र, ताहिर जन्माने पाकिस्तानी आहे. इतकंच नव्हे तर त्याने पाकिस्तानसाठी १९९८चा अंडर नाईन्टीन वर्ल्डकपही खेळला होता. पुढे त्याला पाकिस्तानमध्ये नियमित संधी मिळाली नाही आणि तो दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाला. आफ्रिकन मुलीशी लग्न केल्याने तो तेथील नागरिक बनला. २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यास ताहिर पात्र ठरला.
हेही पाहा- असे क्रिकेटर जे अंडर १९ एकादेशाकडून तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट दुसऱ्या देशाकडून खेळले
कॉलिन डी ग्रँडहोम
कधी आपली हेअर स्टाईल, कधी तुफान बॅटिंग तर कधी हमखास विकेट मिळवून देणारी बॉलिंग यामुळे न्यूझीलंडचा ऑलराऊंडर, कॉलिन डी ग्रँडहोम चर्चेत येत असतो. ग्रँडहोम सध्या टेस्ट प्लेअर बनला असला तरी, मागील काही वर्ष त्याने न्यूझीलंड आणि फ्रेंचायझी क्रिकेटसाठी ऑलराऊंडर म्हणून गाजवली. न्यूझीलंडसाठी कंसिस्टन्ट परफॉर्मन्स केलेला ग्रँडहोम मुळात त्या देशाचा नाहीच. ग्रँडहोमचा जन्म झिम्बाब्वेतील आणि विशीत येईपर्यंत तो तिथेच खेळला. त्याने २००४ अंडर नाईन्टीन वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्वही केले. पुढे झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये वादळ आले आणि क्रिकेटर्सने देश सोडला. २००६ ला ऑकलंडमध्ये त्याने आपल्या क्रिकेटची नवी इनिंग सुरू करत, शानदार यश मिळवले.
ग्रँट इलियट
सन २०१५ वर्ल्डकपला न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सेमी फायनलमध्ये डेल स्टेनला लास्ट बॉलला सिक्स मारणारा बॅटर म्हणजे ग्रॅंट इलियट. त्याच्या या सिक्सने न्यूझीलंड पहिल्यांदा वर्ल्डकप फायनल खेळली. मात्र, न्यूझीलंडचे स्वप्न पूर्ण करणारा हा इलियट जन्माने किवी नाही. इलियट २०००च्या अंडर नाईन्टीन वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी खेळलेला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत नॅशनल टीममध्ये जागा मिळविण्यासाठी कडवी स्पर्धा असल्याने त्याने, न्यूझीलंडला प्रयाण केले. २००१ ला न्यूझीलंडमध्ये गेल्यानंतर तब्बल सात वर्षांनी त्याला इंटरनॅशनल क्रिकेट खेळायची संधी मिळाली. त्याच्या वर्ल्डकप परफॉर्मन्ससाठी तो आजही सर्वांच्या लक्षात राहतो.
सौरभ नेत्रवळकर
सौरभ नेत्रवळकर हे नाव कदाचित तुम्हाला लगेच आठवणार नाही. मुंबईकर असणारा सौरभ अमेरिकेत क्रिकेट खेळतो. इतकेच नव्हे तर त्याने अमेरिकन नॅशनल टीमला लीडही केलंय. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला सौरभ २०१० अंडर नाईन्टीन वर्ल्डकपमध्ये इंडियाचा सर्वात सक्सेसफुल बॉलर होता. मुंबईसाठी रणजी खेळणाऱ्या सौरभने इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यासाठी व सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून करिअर घडवण्यासाठी अमेरिकेचा मार्ग धरला होता.
जोनाथन ट्रॉट
सन २००५ नंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये ज्या क्रिकेटरची सर्वात जास्त हवा होती तो होता जोनाथन ट्रॉट. जोनाथन ट्रॉट अत्यंत कन्सिस्टंटली परफॉर्मन्स देत होता. जवळजवळ दहा वर्ष इंग्लंडच्या बॅटिंगचा भार वाहणारा ट्रॉट वयोगट आणि अंडर नाईन्टीन क्रिकेट दक्षिण आफ्रिकेसाठी खेळायचा. श्रीलंकेत झालेल्या २००० वर्ल्डकपमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केलेले. पुढे २०१५ मध्ये त्याने अवघ्या ३३ व्या वर्षी इंटरनेशनल क्रिकेटला रामराम केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शारीरिक व्यंगावर मात करत ‘हे’ ५ क्रिकेटर्स बनले दिग्गज, टीम इंडियाच्या २ खेळाडूंचा समावेश
लंबूजी! क्रिकेटच्या मैदानावर ‘या’ खेळाडूंच्या उंचीचीच रंगते चर्चा, ‘टॉप’ला फक्त पाकिस्तानी क्रिकेटर






