जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक मोठे खेळाडू आहेत, ज्यांनी कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली, मात्र त्यानंतर फलंदाजीत मोठं यश मिळवलं. या खेळाडूंनी दीर्घकाळ फलंदाजीत आपल्या संघासाठी महत्त्वाच्या खेळी खेळल्या. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत.
(5) कॅमेरून व्हाइट – ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू कॅमेरून व्हाईट यानं लेगस्पिनर म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. भारताच्या दौऱ्यात त्यानं सचिन तेंडुलकरची विकेट घेतली होती. मात्र, फारशी विविधता नसल्यामुळे त्याला गोलंदाज म्हणून यश मिळालं. यानंतर व्हाईटनं त्याच्या फलंदाजीवर काम करण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाकडून 4 कसोटी, 91 वनडे आणि 47 टी-20 सामने खेळलेल्या व्हाईटच्या नावावर 3000 हून अधिक धावा आणि 18 विकेट आहेत.
(4) रवी शास्त्री – माजी भारतीय खेळाडू रवी शास्त्री यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीला डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून सुरुवात केली होती. ते दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आले होते. कालांतरानं, त्यांनी आपल्या फलंदाजीकडे लक्ष दिलं आणि ते भारतासाठी एक अव्वल फळीतील फलंदाज म्हणून उदयास आले. रवी शास्त्री यांनी भारताकडून 230 सामने खेळताना एकूण 280 विकेट घेतल्या आणि 6938 धावा केल्या आहेत.
(3) स्टीव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथनं गोलंदाज म्हणून संघात आपलं स्थान निर्माण केले होतं. सुरुवातीच्या काळात तो लेगस्पिन गोलंदाजी तसेच खालच्या क्रमात फलंदाजी करत असे. मात्र, त्यानंतर तो जागतिक क्रिकेटमधील महान कसोटी फलंजाज म्हणून उदयास आला. स्मिथने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16326 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्यानं 64 विकेट्स घेतल्या आहेत.
(2) शोएब मलिक – शोएब मलिक पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील एक दिग्गज खेळाडू आहे. त्यानं वयाच्या 17व्या वर्षी ऑफ-स्पिनर म्हणून पदार्पण केलं होतं. सुरुवातील त्यानं अप्रतिम गोलंदाजी केली. मात्र नंतर त्यानं त्याच्या फलंदाजीकडे अधिक लक्ष दिलं, ज्यामुळे तो एक अष्टपैलू फलंदाज म्हणून उदयास आला. मलिकनं पाकिस्तानसाठी अनेक वेळा महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. पाकिस्तानसाठी 446 सामने खेळताना त्यानं एकूण 11867 धावा केल्या आहेत आणि 218 विकेट्सही घेतल्या.
(1) सनथ जयसूर्या – श्रीलंकेचा दिग्गज सलामीवीर सनथ जयसूर्या त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याला डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून संघात सतत स्थान मिळालं होतं. कालांतरानं, जयसूर्यानं एक फलंदाज म्हणून प्रचंड यश मिळवूत श्रीलंकेच्या एकमेव एकदिवसीय विश्वचषक विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या जयसूर्यानं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 586 सामने खेळताना एकूण 21032 धावा केल्या आणि 440 विकेट्सही घेतल्या आहेत.
हेही वाचा –
कानपूर कसोटीत पावसाचा धुमाकूळ, तब्बल 9 वर्षांनंतर भारतात असं घडलं
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत केन विल्यमसनच्या नावे नकोसा विक्रम! काय घडलं जाणून घ्या
आयपीएलमध्ये वेगानं खळबळ माजवली! आता टीम इंडियात दाखल होणार हा तुफानी गोलंदाज