---Advertisement---

अफलातून! बाऊंड्री लाईनवर झेप घेत पठ्ठ्याने एका हाताने पकडला झेल, असा Catch तुम्ही कधीच पाहिला नसेल

Bradley-Currie
---Advertisement---

सध्या इंग्लंडमध्ये टी20 ब्लास्ट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत शुक्रवारी (दि. 16 जून) साऊथ ग्रूपमधील सामना ससेक्स विरुद्ध हॅम्पशायर संघात पार पडला. हा सामना ससेक्स संघाने 6 धावांनी नावावर केला. या सामन्यादरम्यान ससेक्स संंघाच्याच एका खेळाडूने घेतलेल्या झेलाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. विशेष म्हणजे, त्याने घेतलेल्या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चला तर त्या झेलाविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

आतापर्यंत आपण असे अनेक झेल पाहिले आहेत, ज्यामुळे आपल्या भुवया उंचावल्या आहेत. असाच एक झेल टी20 ब्लास्ट (T20 Blast) स्पर्धेदरम्यानही पाहायला मिळाला. झाले असे की, ससेक्स संघाने दिलेल्या 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हॅम्पशायर संघाकडून आठव्या स्थानी बेनी हॉवेल फलंदाजीला उतरला होता. 18 षटकात हॅम्पशायरने 7 बाद 157 धावा केल्या होत्या. त्यांना विजयासाठी 12 चेंडूत 27 धावांची गरज होती. यावेळी हॉवेल स्ट्राईकवर होता आणि ससेक्सकडून 19वे षटक टायमल मिल्स (Tymal Mills) टाकत होता. यावेळी पहिल्या चेंडूवर हॉवेलने चौकार मारला. मात्र, पुढच्याच चेंडूवर त्याला विकेट गमवावी लागली.

ब्रॅडली करीचा झेल
मिल्सच्या दुसऱ्या चेंडूवर हॉवेलने जोरात फटका मारला. हा चेंडू थेट सीमारेषेच्या दिशेने जात होता. यावेळी असे वाटले की, हा षटकार होईल. मात्र, सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या ब्रॅडली करी (Bradley Currie) याने हॉवेलचा प्रयत्न हाणून पाडला. ब्रॅडलीने चित्त्यासारखी झेप घेत एका हाताने झेल पकडला. यावेली तो खाली पडला, पण तरीही त्याने चेंडू सोडला नाही आणि सीमारेषेपासून योग्य अंतर राखले. हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम झेलापैकी एक झेल ठरला. या झेलाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

सामन्याचा आढावा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ससेक्स संघाने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 183 धावा केल्या होत्या. ससेक्सकडून ऑलिव्हर कार्टर याने 33 चेंडूत 64 धावांची खेळी साकारली. यामध्ये 4 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. हॅम्पशायरकडून बेनी हॉवेल आणि जॉन टर्नर यांनी सर्वाधिक प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हॅम्पशायर संघ 9 विकेट्स गमावत 177 धावाच करू शकला. यावेळी हॅम्पशायरकडून लियाम डावसन याने 34 चेंडूत 59 धावांची सर्वोच्च खेळी साकारली. याव्यतिरिक्त झेल पकडणाऱ्या ब्रॅडली याने सर्वाधिक 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. (cricketet bradley curry takes benny howell’s a strange catch at the boundary in vitality t20 blast see video)

महत्वाच्या बातम्या-
रूटने भिरकावला खणखणीत रिव्हर्स स्कूप षटकार, पाहून बोलँडच्याही चेहऱ्याचा उडाला रंग- व्हिडिओ
प्रेम हे! लग्नानंतर चांगलाच चमकला ऋतुराज, पत्नीचा जर्सी नंबर घालून ठोकलं झंझावाती अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---