शिवम दुबेने अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. दुबेने 40 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 60 धावा केल्या होत्या. गोलंदाजी करताना 2 षटकात 9 धावा दिल्या आणि 1 विकेट्स घेतली. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात चांगल्या प्रदर्शनामुळे त्याला सामनावीरही पुरस्कार देण्यात आला होता. शिवमच्या या प्रदर्शनानंतर अशी चर्चा सुरू झाली की, हार्दिक पंड्याची जागा शिवम दुबे घेणार का?
हार्दिक पंड्याच्या जागी शिवम दुबेला केले जाणार का बदली?
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची जागा धोक्यात आली आहे. दुखापतीमुळे पुनरागमन न करू शकणाऱ्या हार्दिकला संघाबाहेर राहावं लागतंय की काय अशी परिस्थिती झाली आहे. 2023 विश्वचषकामध्ये काही सामने खेळल्यानंतर त्याला दुखापत झाली होती. परंतू आता दोन महिन्यांनंतरही तो संघात कमबॅक करु शकलेला नाही. दुसरीकडे अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने मात्र मिळालेल्या संधीनंतर चांगली छाप सोडली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या टी20च्या पहिल्या सामन्यात त्याने चांगले प्रदर्शन करून लक्ष वेधले आहे. जर त्याने आयपीएलमध्ये पण चांगले प्रदर्शन केले तर संघासाठी हार्दिक पंड्याच्या जागी शिवम दुबे एक चांगला पर्याय असू शकतो आणि टी20 विश्वचषकामध्ये सुद्धा निवडले जाऊ शकते.
Tough to digest the fact that I will miss out on the remaining part of the World Cup. I’ll be with the team, in spirit, cheering them on every ball of every game. Thanks for all the wishes, the love, and the support has been incredible. This team is special and I’m sure we’ll… pic.twitter.com/b05BKW0FgL
— hardik pandya (@hardikpandya7) November 4, 2023
शिवम दुबेने भारताकडून खेळताना व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 1 वनडे आणि 19 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. वनडेमध्ये फक्त एक सामना खेळून त्याने 9 धावा केल्या आणि गोलंदाजीमध्ये त्याला यश मिळाले नाही परंतू टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 12 डावात फलंदाजी करताना शिवमने 35.33च्या सरासरीने आणि 139.47 स्ट्राइक रेटने 212 धावा केल्या आहेत. तसेच 2 अर्धशतकही त्याच्या नावावर आहेत. तसेच त्याने टी20मध्ये 7 विकेट्सही घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
IND vs AFG: ही तर धोनीची कृपा! सामनावीर ठरल्यानंतर शिवम दुबेने दिले कॅप्टन कुलला श्रेय
Bhuvneshwar Kumar । 8 विकेट्स घेत गाजवलं ग्रीन पार्क, भुवनेश्वरने पुन्हा ठोठावले टीम इंडियाचे दरवाजे